दुबईच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ विजेतेपदासाठी समोरासमोर येत आहेत. गतविजेती मुंबई इंडियन्स सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी उत्सुक असली तरीही हैदराबादवर मात करुन फॉर्मात आलेल्या दिल्लीचा संघही मुंबईला सहजासहजी विजय मिळवून देणार नाही असं चित्र दिसतंय. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोन गोलंदाजांनी मुंबईकडून यंदाचा हंगाम गाजवला. तेराव्या हंगामाआधी मुंबईने Player Transfer Window अंतर्गत बोल्टला आपल्या संघात घेतलं. बोल्टसारखा जागतिक दर्जाचा खेळाडू मुंबईच्या संघात येणं हे संघाचं भाग्यच असल्याची प्रतिक्रिया कर्णधार रोहित शर्माने दिली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘हा’ योगायोग जुळून आला तर दिल्ली जिंकू शकते आजचा सामना

“नवीन बॉलवर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेऊन देईल असा कोणीतरी एक गोलंदाज आम्हाला हवाच होता. आम्हाला यासाठी फारसा शोध घ्यावा लागला नाही. बोल्ट हा नवीन चेंडू चांगल्या पद्धतीने स्विंग करु शकतो. तो सर्वोत्तम गोलंदाज आहे. आम्हाला नेहमी बोल्ट आमच्या संघात हवा होता आणि यंदाच्या हंगामात तो आमच्या संघात आला हे आमचं भाग्यच. त्याने आम्हाला निराश केलेलं नाही. आतापर्यंत त्याने केलेली कामगिरी तो अंतिम सामन्यातही करेल अशी आम्हाला आशा आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 Final Preview : मुंबईचं पारडं जड, दिल्लीला करावा लागणार संघर्ष

दिल्लीविरुद्ध सामन्यात ट्रेंट बोल्टला दुखापत झाल्यामुळे तो दोनच षटकं टाकू शकला होता. अंतिम सामन्याआधी बोल्टची दुखापत हा मुंबईसाठी चिंतेचा विषय होता. पण यातून तो सावरला असल्याची माहिती कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्याआधी दिली.