भारतात स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी अनेक युवक स्पॅनिश भाषा शिकण्यास उत्सुक असल्यामुळे उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्पॅनिश शिकवण्याबाबत स्पेनची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासोबत चर्चा सुरू असल्याचे स्पेनचे भारतातील राजदूत गुस्तावो रिस्टेग्वी यांन स्पष्ट केले. शनिवारी त्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवना भेट घेतली.
सावित्रीबाई फले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात स्पॅनिश विभाग सुरू करण्यास स्पेन उत्सुक असल्याचेही रिस्टेग्वी यांनी स्पष्ट केले. या विभागांत स्पॅनिश भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
तर ही भाषा शिकवण्यासाठी तज्ञ शिक्षक उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासनही गुस्तावो रिस्टेग्वी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या  भेटीदरम्यान दिले.