23 November 2020

News Flash

Video: गोलंदाज तोच.. फलंदाजही तोच… असा योगायोग कधी पाहिलाय?

आधी वन डे सामना, नंतर IPL... दोन्ही वेळा 'दांडी गुल'

युवा शुबमन गिलची फटकेबाजी आणि अनुभवी मॉर्गनने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. अबुधाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर ७ गडी राखून मात करत कोलकाताने आपल्या विजयाचं खातं उघडलं. KKRने मिळवलेल्या या पहिल्या विजयानंतर चाहत्यांनी युवा शुबमन गिलचं तोंडभरून कौतुक केल. या सामन्यात दोन परदेशी खेळाडूंच्या बाबतीत एक अजब योगायोग घडला.

हैदराबादच्या संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली, पण कोलकाताविरूद्ध तो स्वस्तात बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. चौथ्या षटकात अखेर बेअरस्टोला माघारी परतावे लागले. पॅट कमिन्सने षटकाच्या पाचव्या चेंडूवर बेअरस्टोला गुड लेंग्थ चेंडू टाकला. तो चेंडू खेळताना बेअरस्टो चक्रावला आणि चेंडू मांडीला लागून उडाला. दिनेश कार्तिकने झेल टिपला आणि पंचांनी त्याला बाददेखील ठरवले पण DRSमध्ये तो नाबाद असल्याचे निष्पन्न झालं. या जीवनदानानंतर तो किती धावा करतो याकडे साऱ्यांचं लक्ष होतं पण पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड तिसऱ्या वन डे सामन्यातदेखील कमिन्सने अशाच पद्धतीने त्रिफळाचीत केलं होतं.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर सुनील नरिन एकही धाव न काढता माघारी परतला. यानंतर नितीश राणा आणि गिल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू राणाही फटकेबाजी करताना बाद झाला. कर्णधार दिनेश कार्तिकला राशिद खानने शून्यावर बाद करत कोलकात्याला तिसरा धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या मॉर्गनने गिलला सुंदर साथ देत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. गिलने यादरम्यान मैदानात सुरेख फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. मधल्या षटकांत हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत कोलकाताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला खरा… पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 2:32 pm

Web Title: clean bowled video father of coincidence jonny bairstow stumps in air pat cummins eng vs aus ipl 2020 vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 सेरी-ए फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोच्या गोलमुळे युव्हेंटसची बरोबरी
2 मीराबाईचा अमेरिकेत सराव
3 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : सेरेना, थिम यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश!
Just Now!
X