आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीराचा पुरस्कार प्राप्त करणाऱया हार्दिक पंड्या याने संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली हे आपले प्रेरणास्थान असल्याचे मत व्यक्त केले आहे. हार्दिक पंड्याने धरमशाला येथील सामन्यात तीन विकेट्स मिळवून दमदार पदार्पण केले होते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. रांची येथे बुधवारी होणाऱय़ा चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत पंड्याने संघातील अनुभवी खेळाडूंचे कौतुक केले. विराट आणि धोनी यांना फलंदाजी करताना पाहून खूप काही शिकायला मिळते. दोघंही माझे प्रेरणास्थान आहेत. क्रिकेटप्रती दोघांचे प्रेम पाहून चांगली कामगिरी करण्यासाठीची प्रेरणा मिळते, असे पंड्या म्हणाला. विराट आणि धोनी यांना एकत्र फलंदाजी करताना पाहण्याची आनंद काही वेगळाच असतो, असेही तो पुढे म्हणाला.
दिल्लीतील सामन्यात विराट कोहली आणि धोनी यांनी तिसऱया विकेटसाठी तब्बल १५१ धावांची भागीदारी रचली होती. विराट कोहलीने सामन्यात नाबाद १५४ धावांची खेळी साकारली होती, तर धोनीने ८० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. धोनीच्या फलंदाजी क्रमवारीबाबतही त्याने मत व्यक्त केले. धोनीने चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपण कोणत्या स्थानी फलंदाजीला उतरतो हे महत्त्वाचे नाही. सामन्याची परिस्थिती ओळखून फलंदाजी करता आली पाहिजे, हेच महत्त्वाचे आहे, असे पंड्या म्हणाला.

MS Dhoni is Suffering from Leg Muscle Tear
धोनीबाबत मोठा खुलासा, पायाला झालीय गंभीर दुखापत, डॉक्टरांनी न खेळण्याचा सल्ला दिलेला असतानाही खेळतोय IPL
Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”