Sanju Samson Breaks Dhoni’s Record : आयपीएल २०२४ मधील ५६वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर २० धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ बाद २२१ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात राजस्थन रॉयल्सचा संघ ८ बाद २०१ धावाच करु शकला. या सामन्यात संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८६ धावा केल्या. यानंतर तो वादग्रस्त पद्धतीने झेलबाद झाला, ज्यावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. दरम्यान सॅमसनने या खेळीच्या जोरावर एमएस धोनीचा एक खास विक्रम मोडला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार करणारा भारतीय –

आता संजू सॅमसन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद २०० षटकार ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. संजू सॅमसनच्या आधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. संजूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याच्या १५९ व्या डावात हा टप्पा गाठला, तर धोनीने २०० षटकार मारण्यासाठी १६५ डाव घेतले होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. इतकंच नाही तर एकूण यादीबद्दल बोलायचं झालं तर ख्रिस गिल, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर, किरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल यांच्यानंतर टूर्नामेंटमध्ये २०० षटकार ठोकणारा तो १०वा फलंदाज ठरला आहे.

Rohit Sharma breaks Chris Gayle's record
IND vs BAN : रोहित शर्माने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘हा’ षटकारांचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’
Ravindra jadeja Lifts Rahul Dravid After Wins Best Fielder Medal
IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
Rohit Sharma Statement on India Win and Playing XI
IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….
Arshdeep Singh to pick a wicket on the first ball of a T20 WC 2024 Match against USA
IND vs USA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! आतापर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला केला पराक्रम
43-year-old Yungada bowler Frank Nsubuga
Frank Nsubuga : युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास! टी-२० विश्वचषकात केला सर्वात मोठा पराक्रम
Rohit is the first player to play most T20 World Cup
T20 WC 2024 : रोहित शर्माचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आजपर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
Arshdeep Singh takes two wickets in one over
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात ‘सिंग इज किंग’, एकाच षटकात दोन आयरिश फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता, पाहा VIDEO
Babar Azam breaks Virat's record
ENG vs PAK 4th T20 : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम, इंग्लंडविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम

आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार मारणारे भारतीय फलंदाज –

संजू सॅमसन – १५९ डाव
एमएस धोनी – १६५ डाव
विराट कोहली – १८० डाव
रोहित शर्मा – १८५ डाव
सुरेश रैना – १९३ डाव

हेही वाचा – IPL 2024: संजू सॅमसन Out की Not Out? इरफान पठाण-नवज्योत सिंग सिद्धू यांच काय आहे म्हणणं…

मूळचा केरळचा असलेला संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. तो सध्या आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीचा विराट कोहली आणि सीएकेचा ऋतुराज गायकवाड यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सॅमसनने कॅपिटल्सविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनचा अलीकडेच वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.