भारताच्या साई प्रणीतने सिंगापूर ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारताच्याच किदाम्बी श्रीकांतला पराभूत करत प्रणीतने विजेतेपदाला गवसणी घातली. पहिलेवहिले सुपर सिरीज विजेतेपद पटाकावणाऱ्या प्रणीतने श्रीकांतचा १७-२१, २१-१७, २१-१२ असा तीन गेममध्ये पराभव केला. प्रणीतने याआधी श्रीकांतला ४ वेळा पराभूत केले होते, तर केवळ एकदा पराभव पत्करला होता. सिंगापूर ओपन सुपर सिरीजमध्ये विजय मिळवत प्रणीतने श्रीकांतचा पाचव्यांदा पराभव केला.

पहिल्या गेममध्ये साई प्रणीत पिछाडीवर होता. मात्र तरीही त्याने श्रीकांतला चांगली लढत दिली. मात्र मोठी आघाडी असल्याचा फायदा श्रीकांतला झाला आणि त्याने पहिला गेम २१-१७ असा खिशात घातला. दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये प्रणीत अनुक्रमे १-८ आणि १-६ असा पिछाडीवर होता. मात्र यानंतर प्रणीतने जोरदार मुसंडी मारली. श्रीकांतने आघाडी घेतली असली, तरी प्रणीतचा प्रतिकार जबरदस्त होता. त्यामुळे पहिला गेम गमावून आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये पिछाडीवर असूनही प्रणीतने जोरदार कामगिरी केली.

प्रणीत सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी श्रीकांतने सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे. आता श्रीकांतला पराभूत करत साई प्रणीतने पहिल्यावहिल्या सुपर सिरीज जेतेपदाची कमाई केली. सिंगापूर ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत यंदा दोन्ही खेळाडू भारतीय होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.

लाईव्ह अपडेट्स

१.३२- श्रीकांतकडे ११-७ अशी आघाडी

१.४०- श्रीकांत २०-१५ ने आघाडीवर

१.४४- श्रीकांतने पहिला गेम २१-१७ ने जिंकला

१.५२- दुसऱ्या गेममध्ये अटीतटीची लढाई; प्रणीत ९-८ ने आघाडीवर

१.५३- किदम्बीने लागोपाठ दोन गुण कमावले; किदम्बीकडे १०-९ अशी आघाडी

१.५५- प्रणीत १२-१० ने आघाडीवर

१.५६- किदम्बी आणि श्रीकांतचे १४-१४ गुण

१.५८- प्रणीत १६-१४ ने आघाडीवर

१.५९- प्रणीत १७-१५ ने आघाडीवर

२.००- प्रणीतकडे १९-१५ अशी आघाडी

२.०१- किदम्बीचे लागोपाठ २ गुण

२.०२- प्रणीतने दुसरा गेम जिंकला; दोघांनी एक एक गेम जिंकल्याने सामना बरोबरीत

२.०५- तिसऱ्या गेममध्ये प्रणीत ४-२ ने आघाडीवर

२.०६- प्रणीत ५-३ ने आघाडीवर

२.०७- प्रणीतचे लागोपाठ तीन गुण; ८-३ अशी आघाडी

२.०८- प्रणीतकडे १०-३ अशी मोठी आघाडी

२.०९-  प्रणीतकडे ११-५ अशी आघाडी

२.११- प्रणीत ११-६ ने आघाडीवर

२.१२- प्रणीत १२-७ ने आघाडीवर

२.१३- प्रणीतला दोन गुण; १४-७ ने आघाडीवर

२.१४- प्रणीतला १६-८ अशी आघाडी

२.१५- प्रणीत १७-११ ने आघाडीवर

२.१६- प्रणीत १८-११ ने आघाडीवर; गेम जिंकण्याासाठी ३ गुणांची गरज

२.१७- प्रणीत  १९-१२ ने आघाडीवर

२.१७- प्रणीतने दुसरा गेम जिंकला; स्पर्धेचे विजेतेपद