करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असलेल्या काही ठिकाणचा ऑलिम्पिक ज्योतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येईल, असे संयोजन समितीच्या अध्यक्षा सेइको हशिमोटो यांनी सांगितले.

‘‘काही जणांनी ऑलिम्पिक ज्योतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. काही भागांतील करोनाबाबतची परिस्थिती झटक्यात बदलत आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घ्यावे लागतील. अखेरच्या क्षणी कार्यक्रम रद्द करता येईल की नाही, याचीही चाचपणी केली जाईल,’’ असे हशिमोटो यांनी सांगितले.

जपानमधील किती टक्के प्रेक्षकांना टोक्यो ऑलिम्पिकसाठी प्रवेश द्यायचा, याबाबतचा निर्णय एप्रिल महिन्याच्या अखेरीस घेतला जाईल, असेही हशिमोटो म्हणाल्या.