पुरुष संघाचा उपांत्यपूर्व सामन्यात पराभव

जयपूर : महाराष्ट्राच्या पुरुष संघाची ६७व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील वाटचाल राजस्थानने रोखली. राजस्थानने गुरुवारी उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राला ४७-३४ अशी धूळ चारत जणू राष्ट्रीय विजेतेपद मिळवण्याप्रमाणेच जल्लोष साजरा केला.

Chandrashekhar bawankule, bawankule claims that NCP sharad Pawar Group s all Candidates Will Be Defeated, lok sabha 2024, sharad Pawar Group, sharad Pawar Group going to Be Zero, bjp, satara lok sabha seat, election campaign, marathi news, satara news, sharad pawar, bjp state president Chandrashekhar bawankule,
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

पूर्णिमा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर चालू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने क-गटातून गटविजेत्याच्या रूबाबात बाद फेरी गाठून अपेक्षा उंचावल्या. मग गुरुवारी सकाळी महाराष्ट्राने उपउपांत्यपूर्व सामन्यात मध्य प्रदेशचा ५२-३७ असा पराभव केला. परंतु राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कमल किशोर, दीपक हुडा आणि सचिन तन्वर यांच्या तुफानी चढायांपुढे महाराष्ट्राचा निभाव लागला नाही. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर राजस्थानने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवताना पहिल्या आठ मिनिटांतच पहिला लोण चढवला. त्यानंतर मध्यांतराला २९-१२ अशी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या सत्रात पंकज मोहिते आणि अजिंक्य पवार यांनी दडपण झुगारण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले.

राजस्थानकडून कमलने चढायांचे सर्वाधिक नऊ गुण मिळवले, तर सचिन आणि दीपक यांनी प्रत्येकी आठ गुण प्राप्त केले. धर्मेद्र सिंहने अप्रतिम पकडी केल्या. महाराष्ट्राकडून पंकजने चढायांचे ११ गुण मिळवून एकाकी झुंज दिली. अजिंक्यने चढायांचे सात तर शुभम शिंदेने पकडींचे पाच गुण मिळवले.

राजस्थानने सुरुवातीपासून सामन्याला वेग दिला. आम्ही तिसऱ्या चढाईवर हा सामना खेळण्याची आवश्यकता होती. परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंना संयम राखता आला नाही. परिणामी हा सामना हातातून निसटला. महाराष्ट्राच्या खेळाडूनी दीपक हुडा आणि सचिन तन्वर या खेळाडूंचे मोठे दडपण बाळगले.

– आशिष म्हात्रे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक

महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्याचे आमच्यावर अतिशय दडपण होते. सकाळच्या उपउपांत्यपूर्व सामन्यानंतर आमचे चित्त थाऱ्यावर नव्हते. महाराष्ट्राचे उजव्या बाजूचा बचाव अभेद्य आहे, याची आम्हाला जाणीव होती. त्यानुसारच आम्ही रणनीती आखून यश मिळवले.

– सचिन तन्वर