आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घौडदौड कायम राहिली आहे. दुसऱ्या दिवशी आपला तिसरा साखळी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने जपानच्या संघावर ८२-१६ अशी मोठ्या फरकाने मात केली. जपानविरुद्ध सामना हा शनिवारी दुपारी होणार होता. मात्र भारतीय कबड्डी महासंघाने हा सामना शुक्रवारीच पार पडल्याचं सांगत, या सामन्यात भारताने जपानवर ८२-१६ अशी मात केल्याचं स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – कबड्डीच्या मैदानात भारताचं शतक, अफगाणिस्तानचा १०३-२५ च्या फरकाने धुव्वा

२०१६ साली अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषकात जपानच्या संघाने चांगला खेळ केला होता. इराणमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेतही जपानच्या संघाने यजमान इराणला कडवी टक्कर दिली. मात्र जगज्जेत्या भारतीय संघासमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही. यानंतर भारताची साखळी फेरीत अखेरची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. मात्र मिळालेल्या माहितीनूसार संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या या सामन्याच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.

पहिल्या साखळी सामन्यात भारताने इराकवर मात केली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारताकडून इराकचा धुव्वा