इंग्लंडचा कसोटी संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील या संघाने अलीकडेच पाकिस्तानचा ३-० असा व्हाईटवॉश केला. इंग्लिश संघाने तिन्ही सामन्यांमध्ये आक्रमक क्रिकेटचे प्रदर्शन केले. पाहिलं तर बेन स्टोक्स कर्णधार आणि मॅक्युलम प्रशिक्षक बनल्यानंतर इंग्लंडच्या मानसिकतेत असा बदल झाला आहे. इंग्रजीतील नवीन क्रिकेट शैलीला बजबॉल असेही म्हणतात.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने गेल्या एका वर्षात खेळल्या गेलेल्या १० पैकी नऊ कसोटी सामने जिंकले. एकदिवसीय आणि टी२० च्या स्टाईलमध्ये कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लिश संघाचे सर्वजण कौतुक करत आहेत. इंग्लिश क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारा स्टोक्स सध्या आयसीसीवर नाराज आहे. याचे कारण कसोटी क्रिकेटकडे खेळाच्या प्रशासकीय मंडळाचा दृष्टिकोन आहे.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

वेळापत्रकाची काळजी घेतली जात नाही: स्टोक्स

आक्रमक क्रिकेट खेळूनही, बेन स्टोक्सला वाटते की मर्यादित षटकांच्या फॉरमॅटची वाढती लोकप्रियता कसोटी क्रिकेटला धोक्यात आणत आहे. बेन स्टोक्सने व्यस्त वेळापत्रकावरून आयसीसीवर निशाणा साधला आहे. स्टोक्सने इयान बॉथमसोबतच्या संभाषणात सांगितले की, “क्रिकेटच्या वेळापत्रकावर जेवढे लक्ष दिले पाहिजे तेवढे दिले जात नाही. टी२० विश्वचषकानंतर इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका हे त्याचे उदाहरण आहे. या मालिकेला महत्त्व नसताना तीन सामन्यांची मालिका आयोजित करणे किती शहाणपणाचे होते.”

हेही वाचा: IPL: “तुम्ही मला पंजाब मधून बाहेर काढलं…आणि त्यांनी तुम्हालाच…”, लाईव्ह कार्यक्रमात ख्रिस गेलने अनिल कुंबळेवर केला गंभीर आरोप

बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “सध्याच्या युगात कसोटी क्रिकेटबद्दल जी चर्चा केली जात आहे, ती मला आवडत नाही. क्रिकेट चाहते कसोटीऐवजी नवीन फॉरमॅट आणि फ्रँचायझीवर आधारित स्पर्धांना महत्त्व देत आहेत. आपल्या सर्वांना हे समजते की यामुळे खेळाडूंना खूप संधी मिळतात पण माझा विश्वास आहे की कसोटी क्रिकेट खेळासाठी खूप महत्वाचे आहे. स्टोक्सने आयसीसीला कसोटी क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा सल्ला दिला.”

निकालापेक्षा मनोरंजनाकडे जास्त लक्ष द्यावे

स्टोक्स म्हणाला, “मला कसोटी क्रिकेट खेळायला आवडते आणि मला विश्वास आहे की आम्ही या बाबतीत काहीतरी वेगळे करू शकतो. स्टोक्स म्हणाला, “काही लोक म्हणतात की तू इंग्लंडसाठी खेळत आहेस जे पुरेसे आहे. पण त्यात अजून बरेच काही आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट उच्च दर्जाचे हवे आहे. पण आम्ही अनेक वेगवेगळ्या संघांसाठी खेळलो आणि खेळाडूही पाहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा प्रकार घडू नये.”

हेही वाचा: Ramiz Raja: “जसं काही FIA ने धाड टाकली…!” पीसीबी चीफची खुर्ची जाताच रमीज राजांनी काढली भडास

स्टोक्स म्हणाला की, “कसोटी क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी निकालापेक्षा मनोरंजनाची गरज आहे.” पुढे बोलताना म्हणाला, “निकालाचा विचार न करता चांगली सुरुवात करता येते. प्रत्येक दिवस आनंददायी बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही लोकांना अंदाज लावण्याची जास्त संधी देऊ नये. जर लोक ते काय पाहणार आहेत याबद्दल उत्सुक असतील तरच हा तुमचा मोठा विजय असू शकतो.” जो रूटकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर स्टोक्सने इंग्लंडला १० पैकी ९ कसोटी विजय मिळवून दिले आहेत.