वृत्तसंस्था, टोरंटो
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवताना पाचव्या फेरीच्या लढतीत अझरबैजानच्या निजात अबासोवला पराभूत केले. या विजयासह गुकेशने गुणतालिकेत संयुक्तरीत्या अग्रस्थान मिळवले आहे. अन्य चार भारतीय बुद्धिबळपटूंना मात्र पाचव्या फेरीत बरोबरीवर समाधान मानावे लागले.
गुकेशला विजय मिळवण्यात यश आले असले, तरी या स्पर्धेत सर्वात खालचे मानांकन असलेल्या अबासोवने त्याला चांगली झुंज दिली, परंतु गुकेशने जिंकण्याची जिद्द सोडली नाही. जवळपास सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन लढतीत गुकेशने ८७ चालींअंती विजय मिळवलाच. गुकेश पाच फेऱ्यांनंतर अपराजित आहे. त्याने दोन विजय नोंदवले असून तीन लढती बरोबरीत सोडवल्या आहेत. त्यामुळे ३.५ गुणांसह तो संयुक्तरीत्या अग्रस्थानावर आहे. त्याच्याप्रमाणेच गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील विजेत्या इयान नेपोम्नियाशीचेही ३.५ गुण आहेत. नेपोम्नियाशीला पाचव्या फेरीत भारताच्या आर. प्रज्ञानंदने बरोबरीत रोखले.
हेही वाचा >>>RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
खुल्या विभागातील अन्य लढतींत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने फ्रान्सच्या अलिरेझा फिरूझावर विजय मिळवला, तर भारताच्या विदित गुजराथीने जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. नाशिककर विदितला गेल्या दोन फेऱ्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विश्रांतीच्या दिवसानंतर त्याने चांगले पुनरागमन केले. दुसऱ्या फेरीत नाकामुराला पराभवाचा धक्का देणाऱ्या विदितने कारुआनाविरुद्धही आपल्यातील गुणवत्ता दाखवली. कारुआनाचा राजा पटाच्या मध्यात अडकवला होता. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या विदितलाही अचूक चाली रचाव्या लागत होत्या. मात्र, वेळेअभावी दोन्ही खेळाडूंनी धोका पत्करणे टाळले. त्यामुळे अखेरीस ही लढत बरोबरीत सुटली.
त्यापूर्वी, पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या गुकेशला अबासोवच्या पेट्रॉफ बचावाचा सामना करावा लागला. गुकेशने चांगल्या चाली रचत वेळ नियंत्रणाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पटावर भक्कम स्थिती मिळवली होती. मात्र, ४०व्या चालीत गुकेशकडून चूक झाली आणि अबासोवला पुनरागमनाची संधी मिळाली. यानंतर अबासोवने कडवी झुंज देताना ८०व्या चालीपर्यंत बरोबरीची संधी निर्माण केली होती. परंतु ८३व्या चालीत अबासोवने मोठी चूक केली आणि सामन्याचे पारडे गुकेशच्या बाजूने झुकले. अखेर गुकेशने ८७व्या चालीत विजय मिळवला.
महिला विभागातील चारही लढती बरोबरीत सुटल्या. त्यामुळे चीनच्या टॅन झोंगीने ३.५ गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले. भारताच्या कोनेरू हम्पीची विजयाची प्रतीक्षा कायम राहिली.
पाचव्या फेरीचे निकाल
’ खुला विभाग :
डी. गुकेश (एकूण ३.५ गुण) विजयी वि. निजात अबासोव (२), अलिरेझा फिरुझा (१.५) पराभूत वि. हिमारू नाकामुरा (२.५), विदित गुजराथी (२) बरोबरी वि. फॅबियानो कारुआना (३), आर. प्रज्ञानंद (२.५) बरोबरी वि. इयान नेपोम्नियाशी (३.५).
’ महिला विभाग :
आर. वैशाली (२.५) वि. बरोबरी अॅना मुझिचुक (२), कोनेरू हम्पी (२) बरोबरी वि. अलेक्झांड्रा गोर्याचकिना (३), टॅन झोंगी (३.५) बरोबरी वि. नुरग्युल सलिमोवा (२.५). ले टिंगजी (२) बरोबरी वि. कॅटेरिना लायनो (२.५).
गुकेश पारंपरिक प्रकारातील भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू असल्याचे मॅग्नस कार्लसन मागे एकदा म्हणाला होता. त्याचा विश्वास सार्थ ठेवणारा खेळ गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’च्या पाचव्या फेरीत किमान सुरुवातीस तरी केला. स्पर्धेत चाचपडणाऱ्या अबासोववर मिळवलेल्या विजयामध्ये गुकेशच्या खेळातील एक कमतरता पुन्हा प्रकर्षांने जाणवली. विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर तो गडबडतो. गुकेशने अबासोवला पार नामोहरम केले होते, पण ३६व्या चालीत प्यादे पुढे टाकून डाव खिशात घालण्याची सुसंधी त्याने दवडली. अखेर त्याला ८७ चाली खेळून डाव जिंकावा लागला. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक