क्रिकेट आणि एकूणच क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बंगळुरूमध्ये आरएसआय क्रिकेट ग्राऊंडवर साऊथ झोन स्पर्धा (South Zone IA & AD tournament) सुरू होती. या स्पर्धेदरम्यान गुरुवारी (२२ फेब्रुवारी) कर्नाटक राज्य विरुद्ध तमिळनाडू राज्यात क्रिकेट सामना खेळला गेला. सामन्यात कर्नाटकाचा विजय झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करत असताना कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू के. होयसाला (३४) यांची मैदानातच शूद्ध हरपली. छातीत तीव्र वेदना होत असल्यामुळे ते जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

फोटो पाहून प्रेम, लग्नासाठी व्यावसायिक महिलेनं केलं मुलाचं अपहरण; गुन्हा दाखल

२२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची माहिती शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रोजी बाहेर आली. होयसाला हे अष्टपैलू खेळाडू होते. मधल्या फळीत ते फलंदाज आणि गोलंदाजीही करत. त्यांनी अंडर २५ श्रेणीमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच कर्नाटक प्रिमियर लीगमध्येही सहभाग घेतला होता.

पतीने पत्नीला सार्वजनिक ठिकाणी कानाखाली मारणे हा विनयभंग आहे का? जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो?

बंगळुरूमधील बोअरिंग हॉस्पिटल आणि अटल मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, आमच्याकडे जेव्हा क्रिकेटपटू होयसाला यांना आणले गेले, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. आम्ही आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.