Madan Lal’s statement on Indian bowlers : बीसीसीआयने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी-२० विश्वचषक संघातील गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंना स्थान मिळाले आहे, तर खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, १९८३ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेले खेळाडू मदन लाल संघ निवडीबाबत आश्वस्त नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना माजी दिग्गज मदन लाल भारताच्या वेगवान आक्रमणाबद्दल म्हणाले, “मला भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण आवडले नाही. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, इतर गोलंदाजी तितके प्रभावी नाहीत. सिराजने मायदेशात चांगली कामगिरी केली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कामगिरी चांगली नाही. मला वाटतं भारत वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत कमकुवत होत चालला आहे.”मदन लाल यांना वाटते की सिराज आणि अर्शदीप सारखे खेळाडू सध्याच्या आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीत.

टीम इंडिया मोठ्या प्रमाणात बुमराहवर अवलंबून –

त्यामुळे भारतीय संघ अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी जसप्रीत बुमराहवर अवलंबून आहे. मदन लाल म्हणाले, “केवळ टी-२० क्रिकेटमध्येच नाही, तर तुम्हाला एक चांगला वेगवान गोलंदाज हवा आहे, जो तुम्हाला सामना जिंकण्यासाठी विकेट मिळवून देऊ शकेल. बुमराह एक विकेट घेणारा आणि सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. बघूया सिराज कशी कामगिरी करतो. अन्यथा भारत बुमराहवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. समस्या अशी आहे की भारताला दुसरा वेगवान गोलंदाज मिळायला हवा होता.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 : हार्दिकला उपकर्णधार करण्यावर इरफान पठाणने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, “त्याच्यापेक्षा बुमराह…”

माजी दिग्गज खेळाडू मदन लाल पुढे म्हणाले, “तुम्ही इतिहास पाहिला तर, भारताने तेव्हाच चांगली कामगिरी केली आहे, जेव्हा त्यांच्याकडे चांगला वेगवान आक्रमण होते. तेव्हाच त्यांनी अनेक सामने जिंकले. पण मला अर्शदीपबद्दल खात्री नाही आणि मला सिराजबद्दलही खात्री नाही. मला वाटते पंड्या तितकाही प्रभावी नाही आणि मला वाटते की संघ व्यवस्थापनाने त्याच्याबद्दल जोखीम पत्करली आहे. त्यामुळे बुमराह व्यतिरिक्त सिराज आणि अर्शदीप कशी गोलंदाजी करतात हे पाहावे लागेल. गोलंदाजीची बाजू पाहता, मला तेवढा आत्मविश्वास वाटत नाही.

‘मी नटराजनची निवड केली असती’ –

त्यांच्या आवडत्या वेगवान गोलंदाजाबादल विचारले असता, मदन लाल म्हणाले, “मला एक गोलंदाज निवडण्याची संधी मिळाली असती, तर मी नटराजनची निवड केली असती. मी त्याच्यासाटी वचनबद्ध राहिलो असतो. कारण तो डेथ ओव्हर्समध्ये चांगला गोलंदाज आहे. मयंक यादव खूपच लहान आहे. होय, त्याच्याकडे चांगला वेग आहे. पण गोष्ट अशी आहे की तो सातत्याने वेगवान गोलंदाजी करु शकेल की नाही, पण नटराजन प्रत्येक सामन्यात तेच करत आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former legend madan lal said the fast bowling attack is weak of team india selected for the icc t20 world cup 2024 vbm
Show comments