विजय क्लब आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत ‘क’ गटात रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईच्या गोल्फादेवी संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने ठाणे-वाशीच्या ग्रिफीन संघाचा पराभव केला. दादर शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयासमोरील पटांगणात झालेल्या इतर लढतीत साहसी, विजय नवनाथ यांनी सलामी दिली.
पुरुषांच्या ‘क’ गटात गोल्फादेवी आणि ग्रिफिन यांच्यातील लढत चुरशीची झाली. मध्यंतरापर्यंत १०-१० अशा समसमान गुणात असलेल्या या लढतीत गोल्फादेवीने २४-२३ असा विजय मिळवला. लक्ष्मण दोलतडे, पुनित गदमले यांच्या झंझावती चढाया, तर धनंजय सरोजच्या उत्कृष्ट पकडी या विजयात महत्त्वाच्या ठरल्या. उपनगरच्या साहसीने मुंबईच्या साऊथ कॅनराचा २८-२५ असा निसटता पराभव करीत ‘ब’ गटात आगेकूच केली. पराग मोरे, अक्षय शेवडे, किरण देवाडिगा यांच्या खेळाच्या जोरावर साहसीने सामना जिंकला. याच गटात शेवटी झालेल्या सामन्यात मात्र साऊथ कॅनराने अंकुरला १५-१० असे नमवीत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. गौरव शेट्टी, डी. प्रतिकने हा विजय मिळवून दिला. ‘ड’ गटात विजय नवनाथने उपनगरच्या गुरुदत्तचा २२-८ असा धुव्वा उडविला. सागर कुऱ्हाडे, मयूर खामकर, संजय राणे, योगेश सुर्वे यांच्या नेत्रदीपक खेळाने विजय नवनाथने सामना जिंकला.

sushma andhare on Dr Ajay Taware
Pune Porsche Crash : “डॉ. अजय तावरेंच्या जीवाला धोका”, सुषमा अंधारेंनी आर्यन खान प्रकरणाचा हवाला देत म्हटले…
Hasan Mushrif pune car crash
Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, डॉक्टरांच्या अटकेनंतर काँग्रेसचा हसन मुश्रीफांवर आरोप; म्हणाले, “अपघाताच्या रात्री…”
Abdul Malik, Malegaon,
मालेगावात माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर गोळीबार
Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
case of the missing keys Puri Jagannath temple Naveen Patnaik Odisha
‘एवढ्या’ दागिन्यांची सरकारच करतंय चोरी; पंतप्रधानांचा कुणावर आरोप?
Swati Maliwal Case
Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया
swati maliwal assault case
स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर बिभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
delivery baby
“पापी माणसांच्या पोटी मुलगी जन्माला येते”, असं म्हणणाऱ्यांच्या घरात मुलगी जन्माला आली, अन्….