बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून सिडनीच्या मैदानावर सुरू झाला. कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर उर्वरित दोन सामने कोण जिंकणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भारतीय संघात मयंक अग्रवालच्या जागी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले तर उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या संघातूनही विल पुकोव्हस्कीला पदार्पणाची संधी मिळाली. त्यामुळे नवदीप सैनी आणि पुकोव्हस्की या दोन नवोदितांच्या युद्धाकडे साऱ्यांचे लक्ष होतं. त्यात सैनी वरचढ ठरला.

Video: झेल टिपण्यासाठी ऋषभ पंतने घेतली हवेत उडी अन्…

विल पुकोव्हस्की आणि डेव्हिड वॉर्नर दोघे सलामीला आले. वॉर्नरने चाहत्यांची निराशा केली. तो ५ धावांवर माघारी परतला. पावसाच्या व्यत्ययानंतर काही काळ सामना थांबला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा पुकोव्हस्कीने दमदार खेळी करत अर्धशतक ठोकलं. त्यात त्याला दोन वेळा जीवनदान मिळालं. अखेर नवोदित पुकोव्हस्कीसमोर नवोदित नवदीप सैनी आला. सैनीच्या तिसऱ्याच षटकात त्याने पुकोव्हस्कीचा अडसर दूर केला. गुड लेंग्थ चेंडू स्विंग झाला आणि थेट पुकोव्हस्कीच्या पायावर आदळला. त्यामुळे तो पायचीत झाला आणि या द्वंद्वात सैनीचा विजय झाला.

Video: ऋषभ पंतच्या ‘त्या’ कृतीमुळे अश्विनला राग अनावर

आणखी वाचा- “बेटा, तुमसे ना…..”; ऋषभ पंतच्या खराब कामगिरीनंतर भन्नाट मीम्स व्हायरल

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत पहिल्या दिवसअखेर दीडशतकी मजल मारली. पावसाच्या व्यत्ययामुळे कमी षटकांचा खेळ झाला. पुकोव्हस्की व्यतिरिक्त मार्नस लाबूशेननेदेखील अर्धशतक ठोकलं. त्याला स्टीव्ह स्मिथने भक्कम साथ दिली. भारताकडून सिराजने एक आणि सैनीने एक बळी टिपला.