सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली निराशाजनक कामगिरी सुरु ठेवली आहे. ख्राईस्टचर्च कसोटीत भारतीय फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावत भारताकडून पहिल्या सत्रापर्यंत एकाकी झुंज दिली. मात्र कर्णधार विराट कोहलीचं अपयश हे या सामन्यातही त्याची पाठ सोडताना दिसत नाहीये.

अवश्य वाचा – Ind vs NZ : विराट कोहलीच्या अपयशाची मालिका सुरुच

अवघ्या ३ धावा काढत विराट टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर विराटने DRS अंतर्गत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांच्या मागणीतही विराट बाद असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे विराटला माघारी परतावं लागलं. आतापर्यंत कसोटी सामन्यात विराटने पायचीत झाल्यानंतर १३ वेळा DRS चं सहाय्य घेतलं आहे, ज्यात फक्त दोनवेळा यशस्वी ठरलाय.

महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला बाद करत टीम साऊदीने अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीला बाद करण्याची साऊदीची ही दहावी वेळ ठरली.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पृथ्वी शॉला सूर गवसला; अर्धशतकी खेळीसह सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान