Zaka Ashraf ‘dushman mulk’ remark: विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुरुवारी हैदराबादला पोहोचलेल्या पाकिस्तानी संघाचे स्वागत करण्यासाठी अनेक चाहते विमानतळावर पोहोचले होते आणि पाकिस्तानी खेळाडूंच्या- विशेषतः बाबर आझमच्या नावाचा जयघोष करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी पाकिस्तानी संघ भारतात पोहोचताच अप्रत्यक्षपणे भारताला ‘शत्रू देश’ म्हणत वाद निर्माण केला. ज्या दिवशी पाकिस्तानी संघ भारतात पोहोचला त्याच दिवशी पीसीबीने खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली. पाकिस्तानी खेळाडूंच्या पगारात वाढ झाल्याची घोषणा करताना झका अश्रफ म्हणाले, “केंद्रीय करारातील वाढीमुळे खेळाडूंना अतिरिक्त प्रेरणा मिळेल कारण ते अशा देशात विश्वचषकाची तयारी करत आहेत ज्याला काही लोक ‘शत्रू’ मानतात.”

हेही वाचा: Naveen Ul Haq Retirement: कोहलीचा भिडणाऱ्या अफगाणी खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय, वयाच्या २४व्या वर्षी ‘नवीन’ने केली निवृत्तीची घोषणा

जका अश्रफ यांच्या शत्रू देशवक्तव्यावर पीसीबीने स्पष्टीकरण दिले

पीटीआयच्या वृत्तानुसार, अश्रफ यांच्या या टिप्पणीवर दोन्ही देशांमध्ये जोरदार टीका झाली आणि बीसीसीआयही त्यामुळे संतप्त झाले. पीसीबीने शुक्रवारी रात्री उशिरा याबाबत स्पष्टीकरण जारी केले. पाकिस्तानच्या भारतात झालेल्या शानदार स्वागताचा संदर्भ देत अश्रफ म्हणाले की, “यातून दोन्ही बाजूंच्या चाहत्यांची खेळाडूंबद्दल असलेली नितांत आपुलकी दिसून येते.

पीसीबीच्या निवेदनात म्हटले आहे की, “हैदराबाद विमानतळावर झालेल्या स्वागत समारंभात हे प्रेम स्पष्टपणे दिसून आले. अशा स्वागत समारंभाचे आयोजन केल्याबद्दल झका अश्रफ यांनी वैयक्तिकरित्या भारतीयांचे अभिनंदन केले. त्यांनी (अश्रफ) नमूद केले की, जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवतात तेव्हा ते शत्रू म्हणून नव्हे तर पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून समोर येतात.”

हेही वाचा: ICC World Cup 2023 squad: १५० खेळाडू, १० संघ, ४४ दिवस; विश्वचषकाच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

निवेदनानुसार, “अध्यक्ष व्यवस्थापन समितीने देखील यावर जोर दिला की पाकिस्तान आणि भारत यांच्यातील क्रिकेट हे नेहमीच जागतिक लक्ष केंद्रस्थानी राहिले आहे, म्हणूनच दोन्ही देशांमधील क्रिकेट खेळ हा इतर स्पर्धांपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जाते.” दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे, दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये खेळतात. जरी हे दोन्ही देश हे फक्त आयसीसी मालिकांमध्ये खेळत असले तरी भारत-पाकिस्तान संघातील खेळाडूंचे एकमेकांशी चांगले जमते. हैदराबाद विमानतळावर भारताने केलेल्या स्वागताने बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ भारावून गेले. अहमदाबाद येथे १४ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ब्लॉकबस्टर भारत-पाकिस्तान सामन्यात झका अश्रफ सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

सराव सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला

हैदराबादमध्ये विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४५/५ अशी भक्कम धावसंख्या उभारूनही न्यूझीलंडकडून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. केन विल्यमसनच्या पुनरागमनामुळे न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या ४३.४ षटकांत पूर्ण केले. मात्र, गुडघ्याच्या समस्येमुळे विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भाग घेणार नाही आणि तसेच, पाकिस्तानविरुद्धही खेळण्याची शक्यता कमी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak jaka ashraf took u turn on enemy country statement pcb issued clarification avw