Ind vs Eng 2nd Test Result : विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी धुव्वा उडवला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या विजयात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाचे योगदान दिले. हैदराबादमध्ये झालेली पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने पहिल्या डावात जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव २५३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात शुबमनच्या शतकी खेळीमुळे २५५ धावा केल्या. त्याचबरोबर इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २९२ धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७३ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर पहिल्या डावातही त्याने ७६ धावांचे योगदान दिले होते.

जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी गोलंदाजीत कमाल केली. या सामन्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. तर कुलदीपने एकूण ४ विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विन आणि मुकेश कुमारने ३-३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, रेहान अहमद आणि शोएब बशीर यांनी पहिल्या डावात प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. रेहानने ३ आणि अँडरसनला २ विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – SA vs NZ Test : रचिन रवींद्रने द्विशतक झळकावत रचला इतिहास! यशस्वी जैस्वालला मागे टाकत मोडले अनेक विक्रम

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ कमकुवत दिसला –

३९९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ खूपच कमकुवत दिसत होता. संघाची सुरुवात चांगली झाली होती बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. यानंतर जॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने २१.५ षटकांत ९५ धावांत २ विकेट गमावल्या. संघाला पहिला धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, त्याने ६ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. याशिवाय दुसरा धक्का रेहान अहमदच्या रूपाने बसला, ज्याने ५ चौकारांसह २३ धावा केल्या. यानंतर सातत्यान विकेट्स पडत राहिल्याने त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचणे अवघड झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India defeated england by 106 runs in the second test to equal the series vbm