चॅम्पियन करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर दिसतोय. यात आता खाद्य पदार्थालाही क्रिकेटचे वारे लागले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीच्या पार्श्वभूमीवर चंदिगडमधील हॉटेलमध्ये खाण्याच्या पदार्थांमध्येही क्रिकेटचा फिव्हर दिसत आहे. चंदिगड प्रेस क्लबमध्ये भारत- पाकिस्तान सामन्यातील वातावरण लक्षात घेऊन खास मेन्यू तयार करण्यात आलाय. यातील सर्व मेन्यूची नावेही क्रिकेटशी संबंधित आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावाने  ‘कडक चहा’ तर धोनीच्या नावाचे दोन मेन्यू या यादीत दिसतात.

‘बिर्याणी २२ यार्ड’, ‘लॉर्डस स्टेडिअम राईस करी’, ‘बाऊंन्स चीज बॉल’, ‘सिक्स चीज कबाब’, ‘स्केअर कट कल्मी कबाब’, ‘कडक कोहली चाय’, ‘धोनी हेलिकॉप्टर चिकन’, ‘कॅप्टन कूल कोल्ड कॉफी’, ‘टीम इंडिया राजमा चावल’ यासह ‘दाल ५०-५०’ अशी नावे पदार्थांना देण्यात आली आहेत. क्रिकेटशी संबंधित नावामुळेहे मन्यू कार्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकंदरीत पाकिस्तानच्या सामन्यासारखीच या मेन्यू कार्डला देखील पसंती मिळताना दिसतेय. भारतीय सलामी जोडीने २२ यार्डात चांगलाच जम बसवला असून पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना बाऊंन्सरचा मारा करायला सफशेल अपयश आलय असेच चित्र सध्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे मेनू कार्डच्या भाषेत बोलायचे तर विराटच्या नेतृत्वाखालील संघ कडक खेळी करतोय असेच चित्र आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना बर्मिंगहॅमच्या मैदानावर रंगला असला तरी क्रिकेट फिव्हर मेन्यू कार्डवर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या लॉर्डसचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चंदिगडच्या कॅटीनमधील मेन्यू कार्डमध्ये कॅप्टन कूल धोनीच्या नावाने दोन खाद्य पदार्थाची नावे दिसत असली तरी यात लोकल बॉय युवीच्या नावाचा उल्लेख केल्याचे दिसत नाही.

Matheesha Pathirana Statement on Dhoni Said In My Cricket Life MS Dhoni plays my Father Role
VIDEO: पथिरानाने धोनीला दिलं वडिलांचं स्थान; म्हणाला, “माझ्या क्रिकेट जीवनात तो…”
Arshin Kulkarni Debut in IPL
IPL 2024: लखनऊकडून अर्शीन कुलकर्णीचे आयपीएलमध्ये पदार्पण, पण हा मराठमोळा खेळाडू आहे तरी कोण?
Viral Video Young people Playing badminton with an eagle shocks netizens Human vs eagle
अरेच्चा! ‘या’ पक्ष्यालाही लागलं बॅडमिंटन खेळाचं वेड; खेळण्याची स्टाईल पाहून व्हाल थक्क, VIDEO व्हायरल
Former England star spinner Derek Underwood passes away
इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन

 

menu_060417033503