धरमशाला : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसमोर रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचे आव्हान असणार आहे, त्यावेळी संघाचा प्रयत्न विजय मिळवण्याचा राहील.

तीन दिवसांपूर्वीच पंजाबने चेन्नईच्या त्यांच्या घरच्या मैदानावर सात गडी राखून नमवले होते. चेन्नईचा गेल्या तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव होता. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. चेन्नईचा संघ दहा गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. अजून त्यांना चार सामने खेळायचे आहेत. तर, पंजाबचा संघ आठ गुणांसह सातव्या स्थानी आहे.

Confusion at the Argentina Morocco football match in the Olympics sport new
चाहत्यांची घुसखोरी, सामना स्थगित अन् निर्णायक गोल रद्द! ऑलिम्पिकमधील अर्जेंटिना-मोरोक्को फुटबॉल सामन्यात गोंधळ
Argentina vs Morocco Football Match Controversy in Paris Olympics 2024
Paris Olympics 2024 सुरु होताच वादाच्या भोवऱ्यात, अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर चाहत्यांनी फेकल्या बॉटल, मेस्सीची प्रतिक्रिया व्हायरल
, Shamar Joseph six video
ENG vs WI 2nd Test : शमर जोसेफच्या षटकराने प्रेक्षक गॅलरीचे तुटले छत, चाहते थोडक्यात बचावले, VIDEO व्हायरल
Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’
Abhishek Sharma's Embarrassing Record
IND vs ZIM 1st T20 : पदार्पणातच अभिषेक शर्माला चाहत्यांनी करुन दिली धोनीची आठवण, नेमकं काय आहे कारण?
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Dinesh Lad shared a funny story of Rohit's
“यावेळी १०० अंडी आणून ठेवतो बघू…”, रोहित शर्माबद्दल बालपणीच्या कोचचे मजेशीर वक्तव्य, जाणून घ्या काय आहे कारण?
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट

गायकवाड, दुबेकडून अपेक्षा

गेल्या सामन्यात हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर या फिरकीपटूंनी चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. चेन्नईची फलंदाजी ही ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यावर अवलंबून आहे. या दोघांपैकी कोणी एक अपयशी झाल्यास उर्वरित फलंदाजांवर दबाव येतो. गायकवाड या हंगामात चांगल्या लयीत आहे. मात्र, सलामीला संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेला अजूनही छाप पाडता आलेली नाही. त्यातच रवींद्र जडेजा व समीर रिझवी यांना फिरकीसमोर खेळताना अडथळा येत आहे. त्यामुळे विजय मिळवायचा झाल्यास फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल. गोलंदाजांची तंदुरुस्ती हा संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

हेही वाचा >>> IPL 2024 : विजयी लय राखण्याचा कोलकाताचा प्रयत्न; आज लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ; राहुल, नरेनकडून अपेक्षा

बेअरस्टो, करनवर मदार

पंजाबने सलग विजय नोंदवत ‘फ्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्याची आपली दावेदारी कायम ठेवली आहे. पंजाबने हंगामात गुजरात, चेन्नई आणि कोलकाता संघावर त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवले. त्यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असेल. कोलकाताविरुद्ध शतक झळकावणाऱ्या जॉनी बेअरस्टोकडून संघाला अधिक अपेक्षा असतील. मात्र, रायली रूसो, शशांक सिंह व प्रभसिमरन सिंग यांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. जितेश शर्माला या हंगामात चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा असतील. संघाकडे कगिसो रबाडा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग व सॅम करनसारखे गोलंदाज आहेत. त्यांनाही कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. 

* वेळ : दुपारी ३.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप.