पीटीआय, इस्लामाबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय टेनिस संघाने ६० वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करताना डेव्हिस चषक लढतीत अपेक्षित कामगिरी करताना एकतर्फी विजयासह जागतिक गट ‘१’ मध्ये प्रवेश मिळवला. दुसऱ्या दिवशी दुहेरीची आणि परतीची पहिली लढत जिंकत भारताने पाकिस्तानवर ४-० असा विजय मिळविला. भारताचा आठ लढतीत पाकिस्तानवर आठवा विजय ठरला. या विजयाने भारत आता सप्टेंबर महिन्यात गट ‘१’ मध्ये खेळेल. पाकिस्तान गट ‘२’ मध्येच राहील.

दुहेरीच्या लढतीत युकी भांब्री-साकेत मायनेनी या जोडीने विजय मिळवला, तर एकेरीत संधी मिळालेल्या निकी पोंचाने विजयी पदार्पण केले. एकेरीच्या २-० अशा आघाडीसह भारताची युकी-साकेत जोडी दुहेरीसाठी कोर्टवर उतरली. या दुहेरीच्या लढतीत युकी-साकेत जोडीने पाकिस्तानच्या मुझामिल मुर्तझा-अकिल खान जोडीचा ६-२, ७-६ (७-५) असा पराभव केला. पाकिस्तानने दुहेरीत ऐनवेळी बरकत उल्लाच्या जागी अनुभवी अकिल खानची निवड केली होती. पण, युकी-साकेत जोडीने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. साकेतच्या जोरकस ‘सव्‍‌र्हिस’ निर्णायक ठरल्या. पाकिस्तानी जोडी भारतीय जोडीवर कधीच वरचढ ठरू शकली नाही आणि त्यांचा प्रतिकारही करू शकली नाही.

हेही वाचा >>>SL vs AFG : क्रिकेटच्या मैदानात दिसले अनोखे दृश्य, पुतण्याने काकाला दिली पदार्पणाची कॅप; दोघांनी साकारली शतकी भागीदारी

साकेतच्या जोरकस आणि खोलवर ‘सव्‍‌र्हिस’ पाकिस्तानी जोडीला झेपल्या नाहीत. साकेतने आपल्या ‘सव्‍‌र्हिस’वर अभावानेच गुण गमावला. त्याच वेळी युकीच्या कोर्ट गेमदेखील पाकिस्तानी जोडीच्या आकलनापलीकडचा ठरला. परतीच्या एकेरीच्या पहिल्या लढतीत भारताने निकी पोंचाला पदार्पणाची संधी दिली. पाकिस्तानने मोहम्मद शोएबला स्थान दिले. भारताच्या विजयी आघाडीमुळे या लढतीस फारसे महत्त्व नव्हते. पण, निकीने पदार्पणाची संधी अचूक साधली आणि शोएबचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian tennis team wins davis cup match during tour of pakistan amy
First published on: 05-02-2024 at 01:13 IST