सलामीवीर हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत यजमान बांगलादेशवर ७९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. श्रीलंका आणि इंग्लंडकडून हरणाऱ्या भारताने या विजयानिशी स्पध्रेतील आपले खाते उघडले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत ५ बाद १५१ धावांचे आव्हान उभे केले. कौर आणि कर्णधार मिथाली राज (४१) यांनी १०७ धावांची महत्त्वपूर्ण सलामी दिली. कौरने ५९ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह ७७ धावा केल्या आणि सामनावीर पुरस्कार प्राप्त केला. बांगलादेशला २० षटकांत फक्त ८ बाद ७२ इतकीच धावसंख्या उभारता आली. भारताकडून झुलन गोस्वामी आणि शुभलक्ष्मी शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.