भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेळेवर भत्ता न दिल्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे.

प्रत्येक दौऱ्यापूर्वी खेळाडूंना काही भत्ते दिले जातात. या भत्त्यांमधून विदेशातील सर्व खर्च करण्यात येतो. परंतु भारतीय खेळाडूंना विंडीजमध्ये जाऊन आठ दिवस झाल्यानंतरही त्यांचे भत्ते मिळालेले नाहीत.

‘‘बीसीसीआय’च्या नव्या कार्यकारिणी समितीने काही दिवसांपूर्वीच कारभाराला प्रारंभ केला आहे. त्यामुळे खेळाडूंना भत्ते देण्यात काहीसा विलंब झाला, परंतु आता मात्र खेळाडूंना ती रक्कम पोहोचवण्यात आली असून पुढील वेळेस अशी चूक होणार नाही, याकडे आम्ही लक्ष देवू,’’ असे महाव्यवस्थापक (क्रिकेट) साबा करीम म्हणाले.

विजयी सातत्य राखण्यासाठी भारत उत्सुक

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका शुक्रवारपासून सुरू होत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील विजयी कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मिताली राजच्या नेतृत्वखालील भारतीय संघ उत्सुक आहे.

सामन्याची वेळ : रात्री ११ वा.