आखूड टप्प्याचे चेंडू, पंचांचा कौल यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदलांचे संकेत मेरीलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) दिले आहेत.

किशोरवयीन गटातील स्पर्धामध्ये फलंदाजांसाठी घातक ठरू शकणारे आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यावर बंदी घालावी, अशी मागणीक्रीडा विश्वातून होत आहेत. त्यामुळे ‘एमसीसी’चे पदाधिकारी याविषयी चर्चा करणार आहेत. जून २०२१पर्यंतचे पुरावे गोळा करून ते यासंबंधी निर्णय घेतील. तसेच पंच निर्णय आढावा प्रणालीत (युडीआरएस) असणाऱ्या त्रुटींवर ही समिती विचारविनिमय करणार आहे. चेंडूचा यष्टय़ांना ५० टक्क्यांपेक्षा कमी स्पर्श झाल्याचे पुनर्आढाव्यात दिसल्यास आणि पंचांचा कौल नाबाद असेल, तर त्यांनी निर्णय बदलून फलंदाजाला बाद करावे, असा नियम आमलात आणला जाऊ शकतो.