आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धा

पुढील वर्षी बहारिन येथे होणाऱ्या ‘एएफसी’ १६ वर्षांखालील फायनल्स फुटबॉल स्पर्धेकरिता पात्र ठरण्यासाठी भारतीय संघाला रविवार यजमान उझबेकिस्तानविरुद्ध होणारा सामना बरोबरीत राखणे आवश्यक आहे.

भारताने रविवारचा सामना बरोबरीत राखल्यास किंवा विजय मिळवल्यास ते आंतरखंडीय १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारतील. भारताने या स्पर्धेत सलग दोन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आहे. भारताने तुर्कमेनिस्तान आणि बहारिनविरुद्धचे सामने ५-० अशा फरकाने जिंकले आहेत. नियमानुसार, ११ गटातील विजेते आणि दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम चार संघ एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरतील.