IPL 2019 Final MI vs CSK Flashback : करोनामुळे यंदाचे IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पण गेल्या वर्षी आजच्याच दिवशी मुंबई इंडियन्सने IPL विजेतेपदाचा चौकार मारला होता. शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले होते आणि IPL जिंकले होते. मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला बाद करत मुंबईला विजेतेपद मिळवून दिले.

“क्रिकेटमधला सर्वात वाईट निर्णय घेणारा कर्णधार”

असा रंगला होता सामना

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक (२९) झेलबाद झाला. पाठोपाठ रोहितही (१५) झेलबाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव १५, कृणाल पांड्या ७ आणि ईशान किशन २३ धावा करून माघारी परतले. हार्दिक पांड्याही १६ धावाच करू शकला. पण Birthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

‘या’ बाबतीत विराट सचिनपेक्षा उत्कृष्ट – एबी डीव्हिलियर्स

“रन मिळाली नाही की विराट गोलंदाजाला घाणेरड्या शिव्या देतो”

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस २६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रैना ८, रायडू १, कर्णधार धोनी २ धावांवर परतले. रविंद्र जाडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या मदतीने शेन वॉटसनने प्रयत्न सुरूच ठेवले. झुंजार अर्धशतक ठोकल्यानंतर तो शेवटच्या षटकात दुहेरी धाव घेताना ८० धावांवर धावचीत झाला. त्यानंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने शार्दूल ठाकूरला पायचीत केले आणि मुंबईला विजय मिळवून दिला.