Patek Philippe Nautilus Platinum 5711 Watch : आयपीएलच्या १७व्या हंगामाच्या संमाप्तीनंतर काही दिवसात म्हणजे जून महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी ३० एप्रिल रोजी बीसीसीआयने भारताचा १५ सदस्सीय संघ जाहीर केला. यानंतर गुरुवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी टी-२० विश्वचषक आणि टीम इंडियाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, या दरम्याने कर्णधार रोहित शर्माच्या हातातील घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेला ‘पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११’ घड्याळ घालून आला होता.

रोहित शर्माच्या घड्याळाची किंमत किती?

पण तुम्हाला भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या ‘पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११’ (Patek Philippe Nautilus Platinum 5711) या घड्याळाची किंमत माहित आहे का? खरं तर, या घड्याळाची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ घड्याळाची किंमत २.१६ कोटी रुपये आहे. या घड्याळाची इतकी किंमत का आहे आणि त्यात विशेष काय आहे? जाणून घेऊया. हे घड्याळ एक उत्कृष्ट देखावा असण्याव्यतिरिक्त, तांत्रिकदृष्ट्या देखील बरेच प्रगत आहे.

रोहित शर्माला प्रीमियम ब्रँडची घड्याळं आवडतात –

मात्र, रोहित शर्मा महागड्या घड्याळांसह दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरं तर, टीम इंडियाच्या कर्णधारा महागड्या घड्याळांची खूप आवड आहे. याआधीही रोहित शर्माला पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ व्यतिरिक्त रोलेक्स, हबलोट आणि मेस्ट्रो सारख्या प्रीमियम ब्रँडच्या घड्याळांसह पाहिले गेले आहे. मात्र, आता या घड्याळासह रोहित शर्माचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच लोक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की या घड्याळाची किंमत इतकी का आहे?

हेही वाचा – IPL 2024 : शशांक सिंग मेगा ऑक्शन २०२५ पूर्वी पंजाबला सोडणार? सीएसकेच्या सीईओबरोबरचा VIDEO व्हायरल

या घड्याळाची खासियत काय?

पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ घड्याळ २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आले होते.पांढऱ्या सोन्यापासून बनवलेल्या या घड्याळात काळ्या श्रेणीसह सनबर्स्ट ब्लू डायल आहे. तसेच एक स्लीक ४१ मिमी केस आहे. हे घड्याळ केवळ दिसायला सुंदर आणि महागडे नाही, तर १२० मीटरपर्यंत स्व-वळणाची हालचाल आणि पाण्याचा प्रतिकार यासह तांत्रिक प्रगतीने देखील सुसज्ज आहे.