लखनऊ : घरच्या मैदानावर दमदार कामगिरीसाठी प्रयत्नशील असलेल्या लखनऊ सुपर जायंट्ससमोर आज, शुक्रवारी ‘आयपीएल’ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊला सलग दोन सामने गमवावे लागले आहेत. लखनऊच्या फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांविरुद्ध त्यांचा कस लागणार आहे. चेन्नईकडे मथीश पथिराना, मुस्तफिझूर रहमान आणि तुषार देशपांडे यांसारखे गुणवान वेगवान गोलंदाज आहे. रवींद्र जडेजाकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल. लखनऊ येथील संथ खेळपट्टीवर श्रीलंकन फिरकीपटू महीश थीकसानाला संधी दिली जाऊ शकते. शिवम दुबे चांगल्या लयीत असून त्याला रोखण्याचे आव्हानही लखनऊच्या गोलंदाजांसमोर असेल.

हेही वाचा >>> IPL 2024: मुंबईनं पंजाबच्या तोंडचा घास पळवला

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 lucknow super giants vs chennai super kings 34 match preview zws
First published on: 19-04-2024 at 02:24 IST