KKR vs SRH Highlights, IPL 2024: आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरकडून सुनील नारायण आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी सुरुवात केली. या दोघांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. नंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या टी नटराजनने गुरबाजला झेलबाद केले. यानंतर सुनील नारायण आणि व्यंकटेश यांनी संघाची धुरा सांभाळली. त्यानंतर गोलंदाजीकडे परतलेल्या कर्णधार पॅट कमिन्सने सुनील नारायणला बाद केले.

त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी शानदार फलंदाजी करत १४व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो संघासाठी फायदेशीर ठरला नाही. संघाने झटपट विकेट गमावत अवघ्या १५९ धावा केल्या. संघाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला.

Live Updates

IPL 2024, Qualifier 1 KKR vs SRH Live Score: कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात ८ विकेट्सने मोठा विजय मिळवत थेट फायनलचे तिकीट मिळवले आहे.

23:00 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: श्रेयस अय्यरचे तुफानी अर्धशतक

श्रेयस अय्यरनेही सर्वांच्या नकळत अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १३ वे षटक संपताना अय्यर २० चेंडूत ३६ धावांवर होता. १४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हेडची श्रेयसने चांगलीच धुलाई केली. पहिल्या चेंडूवर षटकार, मग चौकार लगावत आपले अर्धशतक केले. मग तिसऱ्या चौथ्या चेंडूवर दोन षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यर २४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५८ धावा करत नाबाद राहिला.

22:46 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: कोलकाताता संघ फायनलमध्ये

कोलकाताने अवघ्या १३.४ षटकांत २ विकेट्स गमावत १६४ धावा करत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. व्यंकटेश अय्यरचे झंझावती अर्धशतक आणि मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसह हैदराबादवर संघावर मोठा विजय मिळवला. तर श्रेयस अय्यरने १४व्या षटकात तीन षटकार आणि एक चौकार लगावत दणदणीत विजय मिळवून दिला.

22:44 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक

फलंदाजीला आल्यापासूनच आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २८ चेंडूत ५१ धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

22:39 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: केकेआरला दुसरा धक्का

कमिन्सच्या सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सुनील नारायण झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने १६ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा केल्या.

22:10 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: कोलकाता पॉवरप्लेनंतर

पॉवरप्लेनंतर कोलकाताने १ बाद ६३ धावा केल्या आहेत. यादरम्याने कोलकाताने गुरबाजच्या रूपात एक विकेटही गमावली आहे. तर हैदराबादने पहिल्या तीन षटकांतच आपले दोन्ही रिव्ह्यू गमावले आहेत.

21:55 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: गुरबाज झाला झेलबाद

चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर नटराजनने गुरबाजला झेलबाद केले आणि केकेआरला पहिला धक्का दिला. बाद होण्यापूर्वी गुरबाजने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २३ धावा केल्या.

21:51 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: हैदराबादने गमावले दोन्ही रिव्ह्यू

हैदराबादने पहिल्या तीन षटकात आपले दोन्ही रिव्हयू गमावले आहेत. कमिन्सने दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर गुरबाज पायचीत असल्याचा रिव्हयू घेतला पण त्याला नाबाद दिले. तर तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नारायण पायचीत असल्याने त्यांनी पुन्हा रिव्हयू घेतला पण तिसऱ्या पंचांनी नाबाद दिले.

21:45 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: कोलकाताच्या डावा सुरूवात

गुरबाज आणि सुनील नारायणची जोडी केकेआऱकडून मैदानात आहे. पहिल्या दोन षटकांमध्येच दोघांनी २६ धावा केल्या. पॅट कमिन्सच्या दुसऱ्या षटकातच या दोघांनी मिळून २० धावा केल्या.

21:33 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: हैदराबादची सर्वसाधारण कामगिरी

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही संघाच्या पथ्यावर पडला नाही. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने ट्रॅव्हिस हेडला बाद केल्याने सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यावेळी हेड आणि एसआरएच या दोघांचा स्कोअर शून्य होता. यानंतर अभिषेक शर्माने आपल्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र वैभव अरोराने त्याला आंद्रे रसेलकरवी ३ धावांवर झेलबाद केले. यानंतर नितीश आणि राहुल यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण मिचेल स्टार्क भन्नाट फॉर्मात होता. त्याने आधी नितीश रेड्डीला झेलबाद केले आणि नंतर शाहबाज अहमदला क्लीन बोल्ड केले.

मात्र, यानंतर राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेन यांनी संघाची धुरा सांभाळली. राहुल त्रिपाठीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच वेळी, क्लासेन देखील रंगात दिसला. पण मिडविकेटवर वरुण चक्रवर्तीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना क्लासेनला सीमारेषेवर रिंकू सिंगने झेलबाद केले. यानंतर काही वेळातच राहुल त्रिपाठी आणि अब्दुल समद यांच्यातील खराब समन्वयामुळे राहुल धावबाद झाला. पुढच्याच चेंडूवर सुनील नारायणने इम्पॅक्ट सब म्हणून आलेल्या सनवीर सिंगला शून्यावर बाद केले. यानंतर भुवनेश्वर कुमार वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर पायचीत होऊन परतला. यानंतर एकट्या कमिन्सने एकट्याने ३० धावा करत संघाला १५९ पर्यंत पोहोचवले.

21:18 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: हैदराबादचा संघ ऑल आऊट

केकेआरने हैदराबादच्या संघाला ऑल आऊट केलं आहे. अखेरच्या षटकातील तीन चेंडू शिल्लक असताना कमिन्स रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यासह हैदराबादने कोलकाताला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले आहे.

21:14 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: कमिन्सने सावरला संघाचा डाव

९ विकेट्स गमावल्यानंतरही कमिन्सने ३० धावा करत संघाचा डाव उचलून धरला आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण धावा मिळवल्या आहेत.

21:02 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: हैदराबादने गमावल्या ९ विकेट्स

१६ व्या षटकातील सहाव्या चेंडूवर चक्रवर्तीने भुवनेश्वर कुमारला पायचीत केले. यासाठी भुवनेश्वरने रिव्ह्यूही घेतला. पण तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद केले. १६ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या ९ बाद १२६ धावा आहे.

20:56 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: अब्दुल समद झेलबाद

१५ व्या षटकात हर्षित राणाच्या चौथ्या चेंडूवर अब्दुल समद १६ धावा करत झेलबाद झाला. १५व्या षटकानंतर ८ बाद १२५ धावा अशी हैदराबादची धावसंख्या आहे.

20:51 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: सुनील नारायणच्या एका षटकात दोन विकेट

१४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठी आणि अब्दुल समद यांच्या खराब समन्वयामुळे अर्धशतक केलेला राहुल त्रिपाठी धावबाद झाला. तर तिसऱ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला सनवीर सिंग क्लीन बोल्ड होत गोल्डन डकवर बाद झाला.

20:43 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: राहुल त्रिपाठीचे अर्धशतक

राहुल त्रिपाठीने मैदानावर घट्ट पाय रोवून उभे राहत संघासाठी एकटाच लढला. त्रिपाठीने ३० चेंडूत ५१ धावा करत १२वे आयपीएलमधील अर्धशतक झळकावले आहे.

20:36 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: हेनरिक क्लासेन झेलबाद

११ व्या षटकातील चक्रवर्तीच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सीमारेषजवळ रिंकू सिंगने त्याला झेलबाद केले. २१ चेंडूत ४ षटकार आणि एका षटकारात ३२ धावा करत बाद झाला. पण बाद होण्यापूर्वी त्याने संघाला १०० धावा करण्यात त्रिपाठीला मोलाची साथ दिली.

20:29 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1:१० षटकांनंतर हैदराबाद

१० षटकांनंतर हैदराबादचा संघ ४ बाद ९२ धावांवर खेळत आहे. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन आणि राहुल त्रिपाठीने संघाचा डाव उचलून धरला आहे.

20:12 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: पॉवरप्लेनंतर हैदराबाद

पॉवरप्लेमध्ये हैदराबादचा संघ केवळ ४५ धावाच करू शकला. संघाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. हेड तर खाते न उघडताच परतला आणि अभिषेक शर्मा केवळ ३ धावाच करू शकला. नितीश रेड्डीने राहुल त्रिपाठीला साथ देण्याचा प्रयत्न केला पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ९ धावा करत बाद झाला. तर शाहबाज अहमदही गोल्डन डकवर बाद झाला. आता क्लासेन आणि राहुल त्रिपाठीची जोडी मैदानात आहे.

20:05 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: एकाच षटकात दोन विकेट

पाचव्या षटकात केकेआरला दोन विकेट्स मिळाल्या आहेत. पाचव्या चेंडूवर नितीश रेड्डीने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि गुरबाजने त्याला झेलबाद केले. तर सहाव्या चेंडूवर शाहबाज अहमदला क्लीन बोल्ड करत गोल्डन डक वर बाद झाला. यासह पाच षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या ४ बाद ३९ इतकी आहे.

19:52 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: केकेआरच्या खात्यात दुसरे यश

कोलकाताला दुसऱ्याच षटकात अजून एक मोठी विकेट मिळाली. दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर वैभव अरोराने अभिषेक शर्माला झेलबाद केले. आंद्रे रसेलने हवेत उडी घेत एक शानदार झेल टिपला. यासह हैदराबादचा संघ २ बाद १४ धावांवर खेळत आहे.

19:35 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: केकेआरच्या खात्यात पहिले यश

कोलकाता नाईट रायडर्सला मिचेल स्टार्कने पहिले यश मिळवून दिले. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीवर विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड क्लीन बोल्ड झाला. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर हेड एकही धाव न करता माघारी परतला.

19:34 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: सामन्याला सुरूवात

पहिल्या क्वालिफायर सामन्याला सुरूवात झाली असून दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात पोहोचले आहेत. हैदराबादकडून हेड आणि अभिषेक शर्माची विस्फोटक फलंदाजी करणारी जोडी मैदानात उतरली आहे.

19:09 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

19:09 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन

19:01 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: नाणेफेक

कोलकाता वि हैदराबादच्या पहिल्या क्वालिफायर सामन्याची नाणेफेक झाली आहे. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोलकाताचा संघ प्रथम गोलंदाजी करेल. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

18:51 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: दोन्ही संघ मैदानात

पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी अहमदाबादच्या मैदानात केकेआर आणि एसआरएच संघांनी मैदानात उतरत सराव सुरू केला आहे. आता थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.

17:50 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: मोठ्या विश्रांतीनंतर केकेआरचा संघ मैदानात उतरणार

कोलकाताचा संघ ११ मे नंतर आयपीएल सामना खेळणार आहे. केकेआरचे मधील दोन सामने पावसामुळे रद्द झाले, त्यामुळे संघाने गेल्या दहा दिवसांमध्ये कोणत्याही संघाविरूद्ध लाइव्ह सामना खेळलेला नाही. त्यामुळे या मोठ्या विश्रांतीचा परिणाम संघावर दिसून येतो का, यावर सर्वांच्या नजरा असतील. तर हैदराबादने नुकताच १९ तारखेला पंजाबविरूद्धचा सामना जिंकला आहे.

17:38 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: केकेआरची सलामीची जोडी बदलणार

फिल सॉल्ट प्लेऑफमधील सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याने कोलकाता नाईट रायडर्सची सलामीची जोडी बदलणार आहे. केकेआरकडून हैदराबादविरूद्धच्या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज सुनील नारायणसोबत सलामीला उतरताना दिसणार आहे. गुरबाजने यापूर्वीही केकेआरसाठी सलामीवीराची भूमिका निभावली आहे.

17:30 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होणार नाही…

हैदराबाद-कोलकातामधील हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो नसणार आहे. या सामन्यातील विजेता संघ हा थेट अंतिम फेरीत पोहोचेल. पण पराभूत झालेला संघ काही स्पर्धेतून बाहेर पडणार नाही. तर या संघाला अंतिम फेरी गाठण्याची अजून एक संधी मिळणार आहे. केकेआर- हैदराबाद सामन्यातील पराभूत संघ नंतर बाद फेरीत पोहोचेल.

17:27 (IST) 21 May 2024
KKR vs SRH Qualifier 1: अहमदाबादमध्ये पावसाचा अंदाज

अहमदाबाद येथे होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरच्या मोठ्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नसल्याची माहिती समोर येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळणार आहे.

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Highlights, IPL 2024 Qualifier: आयपीएल २०२४ मध्ये पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने अष्टपैलू कामगिरी करत हैदराबादवर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.