IPL 2024, Royal Challengers vs Punjab Kings: आयपीएलमधील सहावा सामना आरसीबी विरूध्द पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला.या सामन्यात आरसीबीचा गोलंदाज यश दयालने शानदार गोलंदाजी करत ४ षटकात २३ धावा देत १ विकेटही मिळवली. भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि समालोचक मुरली कार्तिकने यश दयाल याच्यावर केलेले वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या चांगल्या गोलंदाजीची प्रशंसा करताना मुरली कार्तिकने “एखाद्याला नकोसा झालेला माणूस अन्य कुणासाठी मूल्यवान ठरू शकतो,” असे टिव्हीवर समालोचन करताना म्हटले. त्याच्या या वक्तव्याने सोशल मिडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसीबी वि पंजाबच्या सामन्यादरम्यान मुरली कार्तिक समालोचन करत होता. त्याने इंग्रजीमध्ये “Someone’s Trash is Someone’s treasure” असे वक्तव्य केले. यश दयालने चांगली कामगिरी केल्याबद्दल मुरली कार्तिकने त्याचे अशा शब्दात कौतुक का केले. याच्यामागचे कारण म्हणजे यश आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता, जिथे त्याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंग विरुद्ध गोलंदाजी केली होती. त्या एका षटकात रिंकूने त्याला सलग पाच षटकार लगावले होते.

यश दयाल स्वत: हा दिवस कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर गुजरातने त्याला आयपीएल २०२४ पूर्वी रिलीज केले. त्यानंतर मिनी लिलावात आरसीबीने त्याला ५ कोटी खर्चून संघात घेतले. आता आरसीबीकडून खेळत असलेल्या यशने दुसऱ्या सामन्यात आपल्या कामगिरीमुळे चर्चेत आला. पण मुरली कार्तिकच्या त्याच्यावरील या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर त्याच्याविरूध्द संताप व्यक्त केला जात आहे.

आरसीबीने पंजाबविरूध्द ४ विकेट्सने विजय मिळवत घरच्या मैदानावर मोहिमेला विजयाने सुरूवात केली. विराट कोहलीच्या ७७ धावा आणि अखेरच्या षटकांतील दिनेश कार्तिकची फटकेबाजीच्या जोरावर पंजाबचा ३ चेंडू राखून पराभव केला. पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात एक चौकार, एक षटकार लगावत दिनेश कार्तिकने संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rcb vs pbks murali karthik statement on yash dayal said someones trash is someones treasure bdg