कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नावावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. हैदराबादला १४२ धावांवर रोखल्यानंतर कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुबमन गिल एकही धाव न घेता माघारी परतला. यानंतर नितीश राणाही २६ धावांची खेळी करत बाद झाला. यानंतर मैदानावर आलेला कोलकात्याचा कर्णधान दिनेश कार्तिकही एकही धाव न काढता माघारी परतला.

राशिद खानने दिनेश कार्तिकला पायचीत करत कोलकात्याला तिसरा धक्का दिला. हैदराबादविरुद्ध शून्यावर बाद होण्याची कार्तिकची ही चौथी वेळ होती. त्याने अजिंक्य रहाणेला मागे टाकत हा नकोसा विक्रम आपल्या नावे जमा केला.

कोलकात्याच्या बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली असली तरीही युवा शुबमन गिलने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. हैदराबादच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा करत कोलकात्याच्या फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.