एबी डिव्हीलियर्स आणि विराट कोहली यांनी अखेरच्या फळीत केलेली फटकेबाजी आणि फिंच-पडीकल जोडीने करुन दिलेली उत्तम सुरुवात या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. फिंच-पडीकल जोडीने RCB ला पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करुन दिली. या यानंतर मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज माघारी परतल्यामुळे काहीकाळ RCB चा संघ संकटात सापडला होता. मात्र डिव्हीलियर्स आणि कोहली जोडीने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत संघाला शारजाच्या मैदानावर आश्वासक धावसंख्या उभारुन दिली.

अवश्य वाचा – Video : फिंचचा दणका आणि चेंडू थेट मैदानाबाहेर, हा भन्नाट षटकार पाहिलात का??

तिसऱ्या विकेटसाठी कोहली-डिव्हीलियर्स जोडीने शतकी भागीदारी केली. आयपीएलमध्ये शतकी भागीदारी करण्याची कोहली-डिव्हीलियर्स जोडीची ही दहावी वेळ ठरली, अशी कामगिरी आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणीही केलेली नाही.

एबी डिव्हीलियर्सने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. त्याला विराट कोहलीने नाबाद ३३ धावा करत चांगली साथ दिली. KKR कडून प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.