Rohit Sharma Hugs Yashasvi Jaiswal After Century: आयपीएलच्या सुरूवातीपासून फॉर्मशी झगडत असलेल्या यशस्वीने एकाच खेळीने सर्वांची मन जिंकली. मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावून, या युवा फलंदाजाने टी-२० विश्वचषकासाठी आपली दावेदारी मांडली आहे. फक्त शतकच नाही तर त्याने संघाला ९ विकेटने विजय मिळवून देत आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये राजस्थान रॉयल्सला जवळ नेले. जेव्हा जैस्वालने शतक झळकावले तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा विरोधी संघात होता, पण तरीही यशस्वीच्या या कामगिरीसाठी मात्र रोहितच्या चेहऱ्यावरील आनंद झळकताना दिसत होता. रोहितने सामन्यानंतर यशस्वीचे कौतुक करत गळाभेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशस्वी जैस्वालने गेल्या मोसमात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. आता त्याने दुसरे आयपीएल शतकही मुंबईविरुद्ध केले आहे. या मोसमातील राजस्थान संघाचे हे तिसरे शतक आहे. त्याच्या आधी जोस बटलरने दोन शतके झळकावली होती.

यशस्वीच्या शतकाचा व्हिडिओ जिओवर शेअर करण्यात आला आहे. या कॅप्शन दिले होते – IPL 2024 मध्ये शतक झळकावल्यानंतर गार्डनमध्ये फिरणारा मुलगा. खरंतर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यांना मजेदार पद्धतीने इशारा देताना दिसत होता. या मालिकेनंतर रोहितने यशस्वी, ध्रुव जुरेल, सर्फराज, शुबमन या खेळाडूंचा फोटो पोस्ट करत गार्डनमध्ये फिरणारी मुलं असं कॅप्शन दिलं होतं, तेव्हापासून गार्डनमध्ये फिरणारी मुलं हे वाक्य या खेळाडूंसाठी वापरलं जातं.

यशस्वीने शतक साजरं करत असताना फिल़्डिंग करताना रोहितने त्याच्यासाठी टाळ्या वाजवत त्याचे अभिनंदन केले आणि सामन्यानंतर रोहित त्याला भेटायला येताना दिसताच यशस्वीनेही शतकाचा आनंद साजरा करत त्याला पाहून येस अशी प्रतिक्रिया दिली. रोहित ही हसत हसत त्याच्याकडे आला आणि त्याचा गळाभेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सामन्यात काय घडत होता, चेंडू कसा येत होता. यावर हे दोघे बोलताना दिसत होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma praised and hugs yashasvi jaiswal after century video viral mi vs rr ipl 2024 bdg
First published on: 23-04-2024 at 10:48 IST