नवी दिल्ली : विराट कोहलीचा स्विंगकडे दुर्लक्ष करीत चेंडू आधीच खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो आहे. इंग्लिश वातावरणात कोहलीने उशिराने फटके खेळावेत, असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

येत्या चार महिन्यांनी कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरच्या शतकाला तीन वर्षे पूर्ण  होतील.  इंग्लंडविरुद्धचा प्रलंबित पाचवा कसोटी सामना भारताने सात गडी राखून गमावला. या समान्यात कोहलीने अनुक्रमे ११ आणि २० धावा केल्या होत्या.

‘‘इंग्लंडमध्ये उशिराने फटके खेळणे, हीच उत्तम रणनीती ठरते. चेंडूचा पूर्ण अंदाज आल्याशिवाय चेंडू फटकावू नये. कोहली चेंडूने भूमिका ठरवण्यापूर्वीच फटका खेळण्याची घाई करतो,’’ असे गावस्कर यांनी विश्लेषण केले. २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यावर उशिराने चेंडू फटकावण्याच्या धोरणामुळे कोहलीच्या खात्यावर उत्तम धावा जमा होत्या.