मेलबर्न : दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दुय्यम दर्जाचा संघ पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनी सावध झाले पाहिले. यासह कसोटी मालिका किमान तीन सामन्यांची असणे गरजेचे आहे, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेने आपल्या स्थानिक ट्वेन्टी-२० लीगला प्राधान्य देताना न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी नवोदित खेळाडूंचा समावेश असलेला संघ निवडला आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या १४ पैकी सात खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. ‘एसए२०’ या दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-२० लीगला १० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे, तर आफ्रिका-न्यूझीलंड मालिकेतील सामने ४ ते १७ जानेवारी या कालावधीत खेळवले जाणार आहेत.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

हेही वाचा >>> IND vs SA 2nd Test : आयसीसीच्या दुटप्पी वृत्तीवर रोहित शर्मा संतापला; म्हणाला, ‘देश पाहून खेळपट्टीला रेटिंग…’

‘‘ऑस्ट्रेलियाची भूमिका याबाबत नेहमीच स्पष्ट राहिली आहे. बिग बॅश लीग सुरू असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. मात्र, आता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वेळापत्रक ठरवताना अन्य मंडळांशी चर्चा करण्याचा विचार करायला हवा. जेणेकरून भविष्यात अशा अडचणी येणार नाहीत,’’ असे हॉकली म्हणाले.

भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील क्रिकेट मंडळे तीन ते पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करतात. मात्र, अन्य देशांत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाते. ‘‘किमान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आयोजन केले जावे. आगामी काळात दौरा कार्यक्रमात यावर काम केले गेले पाहिजे. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दर्जा अधिक वाढेल,’’ असे हॉकली यांनी नमूद केले.

शास्त्रींचेही असेच मत

’भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.  

’याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली.

’दोन सामन्यांच्या कसोटी मालिकांना काहीच अर्थ नाही. कसोटी मालिकेत किमान तीन सामने असलेच पाहिजेत, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. 

’समाजमाध्यमांवरही अधिक कसोटी सामने हवेत असाच मतप्रवाह होता. ‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात तीन किंवा पाच सामन्यांच्या मालिका होणार आहेत. अन्य देशांतील मालिका या दोन सामन्यांच्या आहेत. मात्र, कसोटी मालिका ही किमान तीन सामन्यांची असायला हवी असे हॉकली यांना वाटते.