पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अ‍ॅथलेटिक्सला नव्या उंचीवर पोहोचायचे झाल्यास आपण पुढील दोन-तीन वर्षांत जागतिक स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे मत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने व्यक्त केले.

भारत २०२९च्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी करणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताने आणखी काही छोटय़ा स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे असे नीरजला वाटते. ‘‘भारताला २०२९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद मिळाले तर उत्तमच. मात्र, दरम्यानचा काळ खूप मोठा आहे. या काळात भारताने जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या काही अन्य स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे,’’ असे चोप्रा म्हणाला. ‘‘छोटय़ा स्तरावरील स्पर्धामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अ‍ॅथलेटिक्सविषयीची गोडी वाढेल. जगभरातील आघाडीचे अ‍ॅथलेटिक्सपटू भारतात आले आणि भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळले, तर ते देशाच्या अ‍ॅथलेटिक्ससाठी खूप मोठे यश असेल,’’ असे नीरज म्हणाला.

हेही वाचा >>>Ind vs Eng: पहिल्या दिवशी इंग्लंड बॅकफूटवर; सर्वबाद २४६, यशस्वीची दमदार सुरुवात

दिग्गजांची भेट..

नीरजला गुरुवारी स्वित्र्झलडचा २० ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीनंतर फेडररने नीरजचे कौतुक केले. ‘‘वैयक्तिक पातळीवर आणि देशासाठी नीरजने जितके यश मिळवले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे,’’ असे फेडरर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra statement that india should organize world level athletics competition amy
First published on: 26-01-2024 at 06:54 IST