दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवड समितीने लोकेश राहुलला डच्चू दिला. विश्वचषकात पाच शतक झळकावलेल्या रोहित शर्माला भारतीय संघात सलामीवीराचं स्थान देण्यात आलं. राहुलच्या सतत अपयशी खेळानंतर रोहितला कसोटी संघात संधी द्यायला हवी अशी मागणी माजी खेळाडूंनी केली होती. यानंतर आफ्रिकेविरुद्ध अध्यक्षीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आलं. मात्र पहिल्याच प्रयत्नात रोहित अपयशी ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव २७९ धावांवर घोषित केला. यानंतर मैदानात आलेल्या अध्यक्षीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघे दोन चेंडू खेळत फिलँडरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर अभिमन्यू इश्वरनही रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

अवश्य वाचा – रोहितवर दबाव नाही, त्याला वेळ दिला जाईल – रवी शास्त्री

२ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांना १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. त्यामुळे कसोटी मालिकेत रोहित शर्मा आपल्यावरील जबाबदारी कशी पार पाडतो आणि भारतीय संघ कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.