Premium

IND vs BAN: रोहित शर्माने रचला इतिहास, भारताकडून ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू

Rohit Sharma Catches Double Century: रोहित शर्माने आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झेलचे द्विशतक पूर्ण केले. या सामन्यात रोहितने मेहंदी हसन मिराजचा झेल घेत हा कारनामा केला.

IND vs BAN Match Updates Sharma Catches Record
रोहित शर्माचे २०० झेल पूर्ण (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Rohit Sharma is the fifth player from India to take 200 catches: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध मेहंदी हसन मिराजचा अप्रतिम झेल घेतला. रोहित शर्माचा हा झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने एका खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वास्तविक, रोहित शर्मा भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०० झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा पाचव्या क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा २०० झेल घेणारा भारताचा ठरला पाचवा खेळाडू –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० झेलांचा आकडा गाठणाऱ्या भारताच्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या आधी हा विक्रम राहुल द्रविड, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांनी केला आहे. आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर सामन्यात रोहित शर्माने बांगलादेशचा फलंदाज मेहंदी हसन मिराजचा झेल घेताच हा पराक्रम केला. याशिवाय भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ४४९व्या सामन्यात हा पराक्रम केला.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने खूप पूर्वी झेलांचे त्रिशतक पूर्ण केले होते. त्याने भारताकडून आतापर्यंत ५०५ सामन्यांमध्ये ३०३ झेल घेतले आहेत. या बाबतीत भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ४३३ सामन्यांमध्ये २६१ झेल घेतले, तर माजी फलंदाज सचिन तेंडुलकर ६६४ सामन्यांमध्ये २५६ झेल घेऊन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तसेच सुरेश रैनाने ३२२ सामन्यांमध्ये १६७ झेल घेतले. तो सहाव्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविड ३३४ झेलांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – SA vs AUS: विश्वचषक २०२३ पूर्वी दक्षिण आफ्रिकेला बसले दोन मोठे धक्के, कर्णधारासह ‘या’ स्टार गोलंदाजाला झाली दुखापत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेतलेले खेळाडू –

राहुल द्रविड – ५०९ सामने – ३३४ झेल
विराट कोहली – ५०५ सामने – ३०३ झेल
मो. अझरुदिन- ४३३ सामने – २६१ झेल
सचिन तेंडुलकर – ६६४ सामने – २५६ झेल
रोहित शर्मा – ४४९ सामने – २०० झेल
सुरेश रैना – ३२२ सामने – १६७ झेल

हेही वाचा – IND vs BAN: रवींद्र जडेजाचा आणखी एक मोठा पराक्रम, कपिल देव नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय

सक्रिय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतले सर्वाधिक झेल –

विराट कोहली- ३०३
स्टीव्ह स्मिथ – २८८
जो रूट- २८०
डेव्हिड वॉर्नर – २०३
रोहित शर्मा – २००
केन विल्यमसन – १८७

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma is the fifth player from india to take 200 catches in international cricket in ind vs ban match vbm

First published on: 15-09-2023 at 19:23 IST
Next Story
IND vs BAN, Asia Cup: शाकिब-तौहीदची झुंजार खेळी! बांगलादेशचे टीम इंडियासमोर २६६ धावांचे आव्हान