देशभरात करोना विषाणूचे रुग्ण आढळायला सुरुवात झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार सतर्कता बाळगून आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सर्व वैद्यकीय यंत्रणा दक्ष असुन करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याचसोबत परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे शाळा-कॉलेजं, मॉल, थिएटर, नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं अशा सुचनाही करण्यात आलेल्या आहेत. करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक मान्यवर व्यक्ती समोर येत आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन, नागरिकांना स्वच्छता बाळगण्याविषयी आवाहन केलं आहे. पाहूया काय म्हणतोय सचिन तेंडुलकर…

दरम्यान, World Health Organization आणि UNISEF च्या माध्यमातून सचिनने याआधी ‪#SafeHandsChallenge नावाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत स्वच्छता राखण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल सचिनने मार्गदर्शन केलं आहे. देशात सध्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारी यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.