Sourav Ganguly Says Sarfraz Khan Test Cricketer : इंग्लंड कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्फराझ खान यंदाच्या आयपीएलचा भाग नाही. लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केले होते. फ्रँचायझीचे संचालक सौरव गांगुली यांनी सर्फराझला सोडण्याचे कारण उघडपणे सांगितले आहे. सर्फराझला कसोटी क्रिकेटर असल्यामुळे त्याला रिलीज करण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. गांगुलीने म्हटले आहे की टी-२० हा एक वेगळा फॉरमॅट आहे आणि सर्फराझने रेड कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

सर्फराझसाठी कसोटी क्रिकेट योग्य फॉरमॅट –

रेव्ह स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली म्हणाला, “मला वाटतं सर्फराझ कसोटी क्रिकेटर आहे. रणजी ट्रॉफी आणि इतर प्रथम श्रेणी स्पर्धांमध्ये त्याने केलेल्या धावांची संख्या विलक्षण आहे. त्याची खेळण्याची शैली कसोटी फॉरमॅटसाठी योग्य आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या धावा कधीही वाया जाणार नाहीत.” आयपीएल २०२४ च्या लिलावानंतर सर्फराझ खानने कसोटी पदार्पण केले होते. राजकोटमध्ये त्याने कसोटी पदार्पण केले.

सर्फराझ सीएसके किंवा केकेआरमध्ये सामील होऊ शकतो –

सर्फराझला क्रिकेटमध्ये ओळख मिळाली ती फक्त आयपीएलच्या माध्यमातून. २०१९ च्या मोसमात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने ८ सामन्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला पुरेशा संधी मिळाल्या नाहीत. दिल्ली कॅपिटल्सकडून दोन हंगाम खेळणाऱ्या सर्फराझने दिल्लीसाठी १० सामन्यांत १४४ धावा केल्या. यामुळे फ्रँचायझीने त्याला रिलीज केले, परंतु सर्फराझबद्दल चर्चा सुरू आहे की सीएसके किंवा कोलकाता नाइट रायडर्स त्याला आपल्या संघात सामील करू शकतात.

हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये खास ‘त्रिशतक’ झळकावण्याच्या जवळ, ‘हा’ मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी

सर्फराझची आयपीएल कारकीर्द –

सर्फराझ खान २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह आयपीएल २०२४ मध्ये सामील झाला होता, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नव्हते. त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने ५० सामन्यांमध्ये २२.५० च्या सरासरीने ५८५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाोच्च धावसंख्या ६७ धावा आहे. २०१९ चा मोसम त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला. त्या मोसमात त्याची सरासरी ४५ होती आणि त्याच मोसमात त्याचे अर्धशतकही आले होते.