ख्रिसमसचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. प्रत्येक लहान मुलाला या सणाच्यादिवशी सांताक्लॉजचं खूप आकर्षण असतं. आपल्याला भेटवस्तू आणि आवडीचा खाऊ देणाऱ्या सांताक्लॉजची सर्व मुलं या दिवशी वाट पाहत असतात. मात्र प्रत्येक मुलांना हा आनंद मिळत नाही. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोलकात्यातील अनाथ मुलांच्या आयुष्यात सांताक्लॉज बनून आनंदाचे चार क्षण दिले आहेत.

StarSports या वाहिनीने विराट कोहलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही सर्व मुलं वर्षभर आमच्या सामन्यादरम्यान सतत चिअर करत असतात. त्यामुळे या मुलांच्या आयुष्यात अशा खास दिवसानिमीत्ताने आमच्यामुळे काही आनंदाचे क्षण येणार असतील तर ते माझं भाग्यच आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला टी-२० मालिकेत २-१ ने मात केली. वन-डे मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. रविवारी या मालिकेतला अंतिम सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे या अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.