भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या शिखरावर आहे. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन क्रिकेट जगतात नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालेल्या मितालीच्या नेतृत्वातील संघासोबतच अष्टपैलू हरमनप्रीतची लोकप्रियता देखील शिगेला पोहचली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमी खेळी केली. ११५ चेंडूत १७१ धावंची खेळी करुन नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा करिश्मा करत तिने नवा विक्रम प्रस्थापित केला. रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात हरमनप्रीतच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असेल. हरमनप्रीतला इंग्लंडमध्ये लीग सामने खेळण्याचा अनुभव भारतीय संघाला कितपत फायदेशीर ठरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिगेला पोहचलेल्या खेळाडूबद्दलच्या काही नवीन गोष्टी जाणून घेऊयात.

१. हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ‘बीग बॅश लीग’मध्ये खेळणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला आहे. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही भारतीय महिलेला या स्पर्धेत स्थान मिळवता आलेले नाही. हरमनप्रीत सिडनी थंडर्स या संघाचे प्रतिनिधीत्व करते.

२. इंग्लंडमधील इसीबी लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय म्हणून देखील हरमीनप्रीतने आपली ओळख निर्माण केली आहे. इंग्लंडमध्ये ती सरे स्टार्स संघाकडून खेळते.
३. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटर्समध्ये ती दुसऱ्या स्थानावर आहे.
४. कौरने २०१३ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे.
५. हरमनप्रीत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला आदर्श मानते.
६.हरमनप्रीत क्रिकेटशिवाय फुटबॉलमध्ये अधिक रुची आहे. फुटबॉलची ती फार मोठी चाहती आहे.
७.दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर वीरेंद्र सहवागने तिला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी सेहवागने महिला क्रिकेटमधील आदर्श क्रिकेटपटू असल्याचा उल्लेख केला होता.
८. तिने भारतीय संघाकडून एकूण ५५ एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.
९. हरमनप्रीतला होबार्ट हरिकेनविरुद्धच्या सामन्यात साहित्याला नुकसान करण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
१०. मोगा प्रीमिअर क्रिकेट अॅकडमीचे मालक कमलदिस सिंह यांनी हरमनप्रीतला सुरूवातीला अर्थिक मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय ती इथपर्यंत पोहोचने फारच कठिण होते.