झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लने सोशल मीडियाद्वारे शूजसाठी प्रायोजक मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याने ट्विटरद्वारे आपली कळकळ व्यक्त केली होती. “आम्हाला प्रायोजक मिळेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला आमचे शूज चिकटवावे लागणार नाहीत”, असे बर्लने म्हटले होते.

बर्लच्या या विनंतीनंतर पुमा (PUMA) कंपनी त्याच्या मदतीला धावली आहे. पुमाने बर्लला स्पॉन्सरशिप दिली असून आता ‘‘आता शूज चिकटवायची गरज नाही”, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले.

 

मुंबईकर क्रिकेटर पृथ्वी शॉने ‘त्या’ चुकीसाठी स्वत: सह वडिलांना धरले जबाबदार!

या गोष्टीनंतर बर्लने पुमाचे आभार मानले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही त्याला पुमा तुझ्या मदतीसाठी उभे राहिल्याचे ट्वीट केले. बर्लने त्याला प्रत्युत्तर देत म्हटले, ”युवराज तू या ब्रँडचा खूप काळ साथीदार होतास आणि हे प्रेरणादायी आहे, त्यामुळे या ब्रँडशी जोडल्यानंतर मी खूप खूष आहे.”

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्यांना कमाईच्या स्वरुपात बक्कळ पैसा मिळतो, असा समज सर्वांना असतो. क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातबाजी, प्रमोशन इत्यादी स्वरुपातही अनेक क्रिकेटपटू पैसे कमावतात. सध्याच्या युगात क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला, तरी तो आयपीएलसारख्या टी-२० लीगमधूनही चांगली कमाई करू शकतो. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अशा क्रिकेट खेळणार्‍या देशांमधील खेळाडूंकडे खूप पैसे आहेत. परंतु झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि नेपाळसारख्या छोट्या देशांचे खेळाडूही क्रिकेट खेळतात, पण ज्यांना जास्त पैसे कमावता येत नाहीत. त्यामुळे अशा क्रिकेटपटूंच्या आर्थिक विवंचनेच्या चर्चा समोर येतात. असेच काहीसे झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लच्या बाबतीत घडले होते.

यूएईत होणार IPLच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन ?