राजेंद्र श्री. भट

rsbhat1957@gmail.com

how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर

आपण घरात कोणती झाडे व कुठे लावणार आहोत यावर कुंडींचा आकार ठरतो. ज्या छोटय़ा झाडांचा विस्तार कमी असतो त्यांना छोटय़ा कुंडय़ा चालतात. तसेच ज्या झाडांचे आयुष्य कमी आहे अशा पेटुनियासारख्या फुलझाडांनासुद्धा छोटय़ा कुंडय़ा चालतात.  घरातील वाया गेलेल्या बरण्या, बादल्या, पाण्याच्या, पेप्सीच्या बाटल्या, श्रीखंडाचे किंवा आइस्क्रीमचे डबे वापरून गॅलरीत झाडे वाढवता येतात.

लागवडीसाठी कुंडय़ा भरताना सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे कुंडय़ांच्या तळाशी जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी योग्य आकाराची छिद्रे असावीत व उभ्या भागावर लहान आकाराची शक्य तेवढी छिद्रे हवा आत जाण्यासाठी असावीत. मातीच्या कुंडय़ा सच्छिद्र असतात व सहसा गरम होत नाहीत. प्लॉस्टिकची कुंडी गरम होते. त्यामुळे मुळांची व जिवाणूंची वाढ चांगली होत नाही.

शक्य असल्यास घरातील एखाद्या फाटलेल्या विरलेल्या जीन्सचे कापड कापून कुंडीच्या आतल्या बाजूने लावावे. विशेषत: ज्या कुंडय़ा उन्हाच्या बाजूस ठेवणार असू त्या कुंडय़ामध्ये.

कुंडय़ांमध्ये सेंद्रिय घटक जास्त प्रमाणात भरल्यास चांगले. कुंडीत भरावयाच्या मातीची पाण्याची निचरा क्षमता चांगली असावी. निचरा क्षमता तपासण्याची सोपी पद्धत म्हणजे मातीवर थोडे पाणी शिंपडून तिचा लाडू करावा. तो जमिनीवर टाकावा. तो जर चेपला तर त्या मातीची निचरा क्षमता चांगली नाही. ती माती पाणी धरून ठेवणारी असते.

अशा मातीत जिवाणूंची व मुळांची वाढ चांगली होत नाही. साधारणपणे पांढरी अथवा काळी माती पाणी धरून ठेवणारी असते, चिकट असते. लाल मातीची निचरा क्षमता चांगली असते. जी माती चिकट असते त्या मातीत अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पाण्याचा निचरा कमी होतो. लाल मातीत अन्नद्रव्ये कमी असतात, पण पाण्याचा निचरा चांगला असतो.

काळी माती भरावयाची असेल तर १/३ भाग माती, वाळू किंवा भाताचे तूस १/३ भाग गांडूळखत किंवा शेणखत असे मिश्रण भरावे. लालसर माती असल्यास १/२ भाग माती, १/४ काडीकचरा, सुकी पाने, उसाचे पाचट इ. व १/४ भाग शेणखत किंवा गांडूळखत असे मिश्रण भरावे.

कुंडीच्या आकारानुसार, छोटय़ा कुंडय़ांसाठी ४-५ चमचे कुडनिंब पेंड व ४-५ चमचे बोनमील (अथवा मील नावाचे कोणतेही खत) मिसळावे. मोठय़ा कुंडय़ासाठी याचे प्रमाण वाढवावे. तळाच्या छिद्रावर विटांचे तुकडे ठेवावेत. बोटाएवढय़ा जाडीचे व लांबीचे लाकडाचे तुकडे, माती भरताना टाकावेत. वरील मातीच्या मिश्रणाने कुंडी भरावी. नर्सरीतून रोपांच्या पिशव्या अलगद कापून खड्डय़ात रोप लावावे. नंतर हलके पाणी देऊन माती दाबून बसवावी. पाणी कुंडीतून बाहेर येणार नाही. इतकेच द्यावे.