उदयन पाठक

कोणत्याही अंतज्र्वलन इंजिनात (IC Engine) इंधनाचे ज्वलन झाल्यावर अतिशय उच्च तापमानाचा आणि दाबाचा वायू तयार होतो. हा वायू नैसर्गिक वातावरण सोडल्यास त्याच्या प्रचंड मोठय़ा प्रमाणात ध्वनितरंग तयार होऊन कानठळ्या बसणारा आवाज होतो. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकींच्या उत्सर्जित वायूंची ध्वनिपातळी इंजिनाच्या आकारमानानुसार जास्तीत जास्त ७५ ते ८० डेसिबल असायला हवी. प्रत्यक्षात ही पातळी ५०० डेसिबल जाऊ  शकते. ती कमी करण्यासाठी सायलेन्सरचा उपयोग होतो. भारतात चार प्रकारचे सायलेन्सर वापरले जातात.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

१ लोखंडी पट्टय़ांचा मफलर प्रकार (Baffle Type Muffler) : यात उत्सर्जित वायुमार्गात लोखंडी पट्टय़ांचा अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे उत्सर्जित वायू लांबच्या मार्गाने जाऊन त्याचा दाब कमी होतो. या प्रकारात इंजिनावर उलट दबाव (Back Pressure) येऊन त्याची ताकद कमी होते. जुन्या पद्धतीच्या स्कूटरमध्ये हा वापरला जायचा. यातील लोखंडी पट्टय़ांवर काजळी जमून उत्सर्जित वायूचा मार्ग आक्रसून जायचा आणि त्यामुळे इंजिनाची तयार आणि गती कमी व्हायची. साधारणत: १५००० किमीनंतर हा मफलर उघडून तो जाळून त्यातली काजळी काढावी लागायची.

२ तरंग रद्दीकरण प्रकारचा मफलर (Wave Cancellation Type Muffler) : यात उत्सर्जित वायूला दोन विभिन्न मार्गानी पाठवून बाहेर पडणाऱ्या एका बाजूच्या ध्वनी तरंगाची अत्युच्च पातळी – माथा (Crest) आणि दुसऱ्या बाजूची नीचांकी पातळी (Trough) एकाच वेळी बाहेर पडतील अशी रचना केली जायची. त्यामुळे आवाजाची पातळी खूपच कमी व्हायची; परंतु इंजिनाच्या वेगवेगळ्या गतीला बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित वायूत ध्वनी पातळी राखण्याला या प्रकारात मर्यादा येतात.

३ अनुनादिक मफलर (Resonence Type Muffler) : यात हेल्महोल्ट्झ अनुनादक ओळीने नळीवर रचले जातात आणि त्या नळीतून उत्सर्जित वायू सोडला जातो. या रचनेमुळे उत्सर्जित वायूतील मूलभूत आणि सुसंवादक ध्वनी तरंग गाळले जाऊन आवाज कमी होत असे.

४ शोषक प्रकारचा मफलर (Absorber Type Muffler) : यात ध्वनिलहरी शोषून घेणारे पदार्थ उत्सर्जित वायूंच्या मार्गात भरले जायचे. हे पदार्थ ध्वनिलहरी शोषून आवाज कमी करतात. पूर्वी या प्रकारात अ‍ॅसबेसटॉस वापरले जायचे; परंतु अ‍ॅसबेसटॉसमुळे कामगारांना श्वसन संस्थेचे आजार आणि कर्करोग होण्याची शक्यता असते. हे लक्षात आल्याने त्याच्या वापरावर बंदी आली. त्यावर उपाय म्हणून काचेचे तंतू आणि लोखंडाचा कीस वापरला जाऊ  लागला. हे नवीन दुचाकींमध्ये वापरले जातात.

सायलेन्सरच्या मफलरमधून जाणारे उत्सर्जित वायूंचे तापमान जास्त असल्याने सायलेन्सर हा कायम गरम असतो. त्यामुळे त्याचा त्वचेशी संपर्क आला तर भाजल्यामुळे जखम होऊ  शकते. त्याचप्रमाणे कृत्रिम धाग्यांचे कपडे विशेषत: महिलांची ओढणी सायलेन्सरच्या संपर्कात येऊन वितळू शकते किंवा त्याला धुरकट डाग पडू शकतात. हे टाळण्यासाठी सायलेंसरला एक सुरक्षापट्टी असते. ती कायम सुस्थितीत असावी.

सायलेन्सरच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी तो सुस्थित ठेवावा. त्याला साफ करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे द्राव उपलब्ध आहेत ते वापरायला हरकत नाही. तसेच ब्रशचा वापर करून सायलेंसरची नळी  साफ ठेवावी. सायलेन्सर गरम असताना त्यावर पाणी मारू नये, त्यामुळे सायलेन्सर गंजून त्याला भोकं पडण्याची शक्यता असते.

आजकाल दुचाकींना खूप जोरात स्फोटसदृश आवाज करणारा सायलेन्सर लावतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांनाच नव्हे तर कुत्रा आदी पाळीव प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो. त्याचा वापर टाळावा.