साहित्य

१ कप चिकन खिमा, १ कोबी, १चमचा लसूण, २ इंच आले, ४-५ मिरच्या, २ चमचे पुदिना, २ चमचे कोथिंबीर, अर्धा चमचा काळीमिरी पूड, ४-५ बदाम तुकडे, ४-५ बेदाणे, १ अंडे, चवीनुसार मीठ.

कृती –

कोबीची पाने वेगळी करून गरम पाण्यात ५ मिनिटे ठेवा. मिक्सरमध्ये चिकन खिम्यात लसूण, आले, मिरची, पुदिना, कोथिंबीर, अंडे टाकून थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे मिश्रण एका वाटीत काढून त्यात बदाम, बेदाणे, मिरपूड आणि मीठ टाकून एकत्र करून घ्या. कोबीच्या पानांवर हे सारण पसरवून त्याचे रोल करून घ्या. आता टूथपीक लावून किंवा धाग्याच्या साहाय्याने ते बांधून घ्या. कुकर किंवा स्टीमरमध्ये वाफवून घ्या. स्वीटचिली सॉसबरोबर खायला घ्या.