सामग्री :

* सोया ग्रॅन्युल्स- २५ ग्रॅम

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

*  एक मोठा कांदा, एक टोमॅटो

*  एक वाटी चिरलेल्या भाज्या- गाजर, वाटाणा, कोबी, प्लावर, शिमला मिरची.

*  एक हिरवी मिरची.

*  फोडणीचे साहित्य-तेल, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, हिंग, धने पावडर.

* कोथिंबीर-अर्धा वाटी चिरलेली. चवीपुरते मीठ.

कृती :

*  सोया ग्रॅन्युल्स पाणी टाकून भिजत ठेवावे. (१० मिनिटे)

*  त्यानंतर पाणी काढून टाकावे.

*  कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घ्यावी.

*  कमी तेलामध्ये फोडणी देऊन कांदा, टोमॅटो चांगले परतून घ्यावे.

*  कांदा, गुलाबी झाल्यानंतर इतर भाज्या टाकून शिजवावे.

* शेवटी मिरची टाकावी.

* भिजवलेले सोया ग्रॅन्युल्स यात टाकून व्यवस्थित हलवावे.

* चीवपुरते मीठ टाकावे.

* कोथिंबीर टाकून खाण्यासाठी द्यावे.

विशेषत:

*  प्रथिने, ब जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात.

*  कबरेदकांचे प्रमाण कमी.

*  वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह, हृदयविकार या विकारांवर उपयुक्त.