अभ्यासाची वेळ आणि जागा निश्चित करा. म्हणजे अभ्यासाचं त्या वेळेशी आणि जागेशी एक नातं तयार होतं.
अभ्यासाचा कोणता भाग कोणत्या स्वरूपात लक्षात ठेवायचा हे नक्की करा म्हणजे काय तर अभ्यास हा प्रश्नोत्तरं, व्याख्या, उपयोजन, नकाशा, आकृती, प्रक्रिया, टप्पेअशा वेगवेगळ्या स्वरूपात करायचा असतो. कुठला भाग यातील कुठल्या पद्धतीने करायचा हे ध्यानात घ्या. गणिताचा अभ्यास वाचन पद्धतीने नाही तर प्रत्यक्ष गणितं सोडवून करावा लागतो. तसेच विज्ञान प्रयोग वाचून लक्षात ठेवण्यापेक्षा जर प्रत्यक्ष केले तर ते कायमस्वरूपीलक्षात राहतात.

जाता, येता, प्रवासात, एखादं काम करत असतानाही तुम्हाला अभ्यास करता येईल. अभ्यासासाठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त इंद्रियांचा वापर करा. उदा. लेक्चर ऐकताना नोट्स घ्या, हाताने एखादं काम करताना सूत्र, कविता पाठ करा.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

’वेगाने वाचायचं असेल तर मनातल्या मनात वाचा. एखादा भाग कळला नसेल तर जणू आपण इतरांना समजावून देत आहोत, अशी कल्पना करत स्वत:ला उद्देशून मोठय़ाने वाचा.

विखुरलेल्या स्वरूपातील गोष्ट लक्षात ठेवायला कठीण असते. त्या तुलनेत ज्या गोष्टीची रचना, आकृतिबंध नीट असेल ती गोष्ट अधिक चांगली लक्षात राहते. त्यातही ऱ्हिदम असेल अथवा शब्दांना ताला-सूराची  जोड असेल तर अधिक चांगलं. म्हणूनच पद्यरचना, गाणी अधिक लक्षात राहतात. अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी जर त्या घटकाचा आकृतिबंध जपलात, मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी काही शॉर्टफॉम्र्स योजलेत, ते एका लयीत लक्षात ठेवलेत, तर अभ्यास करणं आणि तो आठवणं सोपं बनून जाईल.

त्याकरता मिळवलेली माहिती, टिपणं, अधिकचे संदर्भ यांची गटवार विभागणी करा. आधीच्या माहितीशी साम्य शोधून, कधी तुलना करून, कधी फरक शोधून अभ्यासाची व्यवस्थित मांडणी करा.

सतत लक्ष जावं याकरता काही महत्त्वाची सूत्रं कागदावर उतरवून सतत तुम्हाला दिसतील अशा जागी ठेवा. दिसतील तेव्हा वाचून तिचा पुनरुच्चार करण्याचा, ती पुन्हा लिहून काढण्याचा आणि आठवण्याचा प्रयत्न करा. जे मुद्दे चुकले असतील किंवा विसरायला होतील त्या भागाची पुन्हा उजळणी करा.

अभ्यास करताना वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर खूप वेळ अभ्यास केला तरी त्यातून फार काही साध्य होत नाही.  अमूक एक अभ्यास विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचा निश्चय करा, कारण गेलेली वेळ आणि संधी पुन्हा मिळवता येत नाही.

एकच गोष्ट सलग १०० वेळा करण्यापेक्षा १०० वेगवेगळ्या वेळी ती एकच गोष्ट केलीच तर ती तुमच्या चांगलीच लक्षात राहील.

goreanuradha49@yahoo.in