News Flash

पॅडल फॉर नेचर

दिब्रूगड ते अरुणाचलमधील टूटिंग ही सायकल टूर करणाऱ्या बाराजणांमध्ये दोन मुली होत्या.

निसर्गात भटकंतीसाठी या ‘इको फ्रेंडली’ वाहनाला पुन्हा जवळ करणाऱ्या तरुणाईची संख्या हळूहळू वाढतेय. अशाच एकीने शेअर केलेले ‘अरुणाचली’ अनुभव..

सायकलिंगची आवड असणारे खूप जण असतात. पण शाळा सुटल्यावर सायकलही सुटते ती कायमची. निसर्गात भटकंतीसाठी या ‘इको फ्रेंडली’ वाहनाला पुन्हा जवळ करणाऱ्या तरुणाईची संख्या हळूहळू वाढतेय. अशाच एकीने शेअर केलेले ‘अरुणाचली’ अनुभव..

पर्यटकांपर्यंत अद्याप न पोचलेली अनवट वाट.. ढगांच्या वरून चालल्याचा अनुभव देणारं वातावरण, त्या धुक्यातून डोकावणारे बर्फाच्छादित डोंगर, एकीकडे अवखळपणे वाहणारी सियांग आणि दुसरीकडे खडकाळ डोंगरातून दिसणारं घनदाट जंगल, थ्रिलिंग अनुभव देणारे अधांतरी झुलते पूल.. किर्र्र झाडीतून अंधार पडल्यावरही सायकल पळवणारे बारा वेडे वीर.. ऐन दिवाळीत आसाममधील दिब्रूगड ते अरुणाचलमधील टूटिंग ही सायकल टूर करणाऱ्या बाराजणांमध्ये दोन मुली होत्या. त्यापैकीच एकीचे भन्नाट अरुणाचली अनुभव तिच्याच शब्दांत..

सायकलिंगची आवड मला लहानपणापासूनच होती. शाळेनंतर मात्र सायकल सुटली. शहर बदललं. रुटीन बदललं, नाशिकहून मुंबईला आले. सॉफ्टवेअर कंपनीमधली नोकरी.. गरजा बदलल्या आणि सायकल दुरावली. पण मग ठरवून सायकलप्रेम जपायचं ठरवत भाडय़ाने सायकल घेऊन नाइट राइडला सुरुवात केली. तिथेच माझ्यासारखे वेडे सायकलप्रेमी मित्र भेटले आणि त्यांच्याबरोबर ईशान्य भारतातला प्रवास करायचा बेत आकार घ्यायला लागला. खरं तर आमच्या ग्रूपमधले इतर अनेकजण पूर्वीही मोठय़ा सायकल टूर करून आलेले. युथ हॉस्टेलचा मुंबई- गोवा सायकल ट्रेक वगळता माझा अनुभव सगळ्यात तोकडा. गिअरवाली सायकलही नव्हती माझ्याकडे. पुन्हा १२ जणांच्या ग्रुपमध्ये आम्ही दोघीच मुली आणि अरुणाचलसारखा अनएक्सप्लोअर्ड, दुर्गम प्रदेश. १५ दिवस सायकलिंग.. जागा मिळेल तिथे आडवं व्हायचं, मिळेल ते खायचं, असा वेडा प्लॅन होता खरा.. पण थ्रिलिंग! खूप काही देऊन जाणारा आणि माझ्यातल्या स्ट्रेन्थ्सची मलाच ओळख करून देणारा. घरच्यांना कन्व्हिन्स करून ऐन दिवाळीत या अनवट वाटेवरच्या प्रवासाला लागले. या सायकल टूरसाठी ग्रुपमध्ये सगळ्यात शेवटी सामील होणारी मीच. कारण इतर सगळी व्यवधानं सांभाळत, सायकल खरेदी करण्यापासूनची तयारी करत टूर फायनल करण्यात शेवटची घटकाच उजाडली.
2
ईशान्य भारताबद्दल पहिल्यापासून मनात आकर्षण होतं. भूगोलात शिकलेला हा प्रदेश प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता होतीच आणि सायकलवरूनच का.. तर सायकलमुळे माणसं जोडली जातात. प्रदेश व्यवस्थित अनुभवता येतो.. तिथल्या निसर्ग आणि माणसांसहित. या खडकाळ प्रदेशात फिरायला माउंटन बाइकच हवी. माउंटन बाइक्सची किंमत बघता, त्यासाठी लागणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज बघता सायकलिंग ही एक लक्झ्युरिअल हॉबी झालीय हे खरं. पण माझ्यासाठी हॉबीपेक्षा जास्त ती पॅशन आहे. आमचे मित्र सचिन गावकर आणि इतरांकडून ही पॅशन जपण्याची स्फूर्ती मिळते. ‘पेडल फॉर मेंटल हेल्थ’.. मानसिक आरोग्यावर जागृती करण्यासाठी सचिनने १३ हजार किलोमीटरपेक्षा जास्त सायकलिंग करून भारत परिक्रमा केली आहे. सायकलिंगची प्रेरणा अशा सायकलप्रेमींकडून मिळाली आणि वाढत गेली. मग थोडी आर्थिक जमवाजमव करत सायकल खरेदी झाली आणि अशी प्रेरणा घेऊनच दिब्रूगड ते टूटिंग या सायकल प्रवासाला शेवटच्या क्षणी दाखल झाले. माझ्याखेरीज आणखी एकच मुलगी या ग्रुपमध्ये होती. राधिका बोरकर. ती हिमालय फिरलेली आणि यापूर्वीही सायकलवरून भटकलेली. तिच्यामुळे माझा इरादा पक्का झाला आणि हे स्वप्न साकारायला, वेडा प्लॅन पूर्ण करायला आम्ही सज्ज झालो.
ईशान्य भारताच्या या सफरीला सुरुवात झाली आसाममधल्या दिब्रूगडपासून. ब्रह्मपुत्रेचं विस्तीर्ण पात्र साद घालत होतं. आमच्या सायकलींसह लाँचने अरुणाचल प्रदेशातल्या ओयान घाटापर्यंतचा प्रवास ब्रह्मपुत्रेतून केला. पहिल्याच दिवशी बेसकँपला सायकली वेळेत न पोचल्याने आम्ही शेडय़ूलच्या मागे पडलो होतो आणि प्रवासाचा पहिला दिवसच आव्हानाचा ठरला. कारण पूर्वेकडचा प्रदेश असल्याने संध्याकाळी लवकर अंधार पडतो. पाच वाजताच गुडुप अंधार. अरुणाचलमधली पहिली राइड अंधारात करावी लागली. थोडीशी धागधुग मनात बाळगत गर्द झाडीतून अनोळखी रस्ता धुंदाळत केलेला तो पासी घाटाचा प्रवास केवळ अविस्मरणीय.

टूटिंगपर्यंत पोचताना पार केलेला प्रत्येक रस्ता, त्यावरचा प्रत्येक क्षण तसा वेगळाच. ४५० किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलं. त्यातला ८० ते १०० किलोमीटर रस्ता केवळ डांबरी रस्ता म्हणावा इतपत बरा. बाकी सगळा डोंगराळ भागातून जाणारा.. कच्चा रस्ता. पहाटे चार वाजता उजाडणार आणि संध्याकाळी पाचलाच गडद अंधार. मग असं बऱ्याच वेळा शेडय़ूल पूर्ण करण्यासाठी अंधारात प्रवास करावा लागला. अशा वेळी टीम स्पिरिट उपयोगी पडलं. प्रत्येकानं एकेक जबाबदारी उचलली होती. आम्ही मुली म्हणजे नाजूक, लवकर थकणार असा विचारही मनात आला नाही. ग्रुपमधल्या कुणीही अशी वेगळी वागणूक दिली नाही. कुठे स्वतजवळचं अन्न शिजवून खायची वेळ आली, तरी या मुली म्हणजे याच करतील, असं ऐकावं लागलं नाही.

अनेक वेळा आव्हान अशक्य वाटायचं. जमेल की नाही, ही भीती वाटायची. नव्यानेच घेतलेली सायकल असल्याने पुरेशी प्रॅक्टिसही झाली नव्हती. पॅनिअर्स कसे लावायचे इथपासून तयारी. स्वतचं सामान स्वतच्याच सायकलवरून वाहून न्यायचं होतं. त्यामुळे २५ किलोचं ओझं सायकलला लटकवून तशी प्रॅक्टिस नसताना चालवणं हेही आव्हानच होतं. पहिला हँगिंग ब्रिज.. सियांग नदीवरचा गांधी ब्रिज पार करताना अगदी बोबडी वळली होती. लाकडाच्या पट्टय़ा वेलीने बांधून तयार केलेला हा झुलता पूल..
3

लाकडाच्या पट्टय़ा वेलीने बांधून तयार केलेले असे बरेच झुलते पूल वाटेत होते. पाय ठेवताच हलणारे.. पण दोन गावांना जोडणारे. आमच्या सायकल प्रवासातही अनेक आव्हानं आली, पण मैत्रीच्या पुलानं ती पार केली. संपूर्ण प्रवासात ईशान्येच्या माणसांचं प्रेम मिळालं. त्यांची निर्मळता मनाला भावली. सायकलमुळे निसर्गाच्या तर आम्ही जवळ गेलोच. पण तिथली माणसंही जोडली गेली. कायमची!

असला तरी त्याखालची खटय़ाळ सियांग घाबरवत होती. पाऊल ठेवताच पूल हलायचा. शेवटी देवाचं नाव घेत सायकल घातली ते पूल संपल्यावरच पायडल मारण्याचा वेग कमी केला.
असंच आणखी एक आव्हान. यिनकियाँग ते जानबू हा ६१ किमीचा प्रवास सुंदर झाला. पुढे २०- २२ किलोमीटर बाकी होते. अंधार पडलेला आणि पूर्ण चढाचा रस्ता.. खडकाळ प्रदेश. इतकी थकले की अंतर पूर्ण करूच शकणार नाही असं वाटलं त्या क्षणी. पण ग्रुपमध्ये एव्हरयंग अप्पा (धनंजय मदन, वय ५६) आणि महाडिक काका (वय ६१ आणि अँजिओप्लास्टी झालेली) यांच्याकडे बघून प्रेरणा मिळत गेली. टूटिंगहून परतताना ३० तासांची ट्रक राइड हा अनुभवदेखील असाच भन्नाट. सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या ट्रकमधून केलेला हा प्रवास म्हणजे रोलर कोस्टर राइडच. पण या संपूर्ण प्रवासात ईशान्येच्या माणसांचं प्रेम मिळालं. त्यांची निर्मळता मनाला भावली. या प्रदेशात मातृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे मुलगी म्हणून भीती तर कधीच नाही वाटली. उलट सायकल चालवणाऱ्या मुली बघून ‘अब आप टूटिंग जायेगा.. बेटी भी चलायेगा?’ म्हणत वेळोवेळी आस्थाच प्रकट झाली. जागोजागी हिरीरीनं उद्योगांत रमलेल्या काटक अरुणाचली स्त्रिया दिसल्या. टूटिंगला एक छोटेखानी हॉटेल चालवणाऱ्या स्त्रीने आस्थेवाईकपणे चौकशी तर केलीच, पण पुढच्या ३० तासांच्या प्रवासासाठी तयार झालेल्या ट्रक ड्रायव्हरला ‘लेडीज को आगे बिठाओ, पिछे मत बिठाओ’ असं सांगत दमातही घेतलं तिनं छान. खूप बरं वाटलं.. या माणसांशी नातं जोडताना, त्यांना आमच्या घरचा खाऊ देताना आणि त्यांच्या घरचं जेवण जेवताना!
दिब्रूगडला परतल्यावर विवेकानंद केंद्र शाळेच्या अकरावी-बारावीच्या मुलांशी संवाद साधला. आमच्या प्रवासाविषयी सांगितलं. ‘आमच्याच प्रदेशात आम्ही असं अजून सायकलिंग केलेलं नाहीय’ असं त्यांनी सांगितलं. आम्ही मुंबईत परतल्यावर या मुलांपैकीच एक अनीश कश्यपने मेसेज केला.. आम्ही ‘बाइक क्रू’ नावानं सायकलिंग ग्रुप बनवल्याचं त्यानं लिहिलं. त्या १०-१२ जणांनी २० किलोमीटरची एक छोटी सायकल राइडही करून बघितली. त्याचे फोटो लागलीच आम्हाला शेअर केले. दुसऱ्या एकाने सायकल घ्यायचं स्वप्न असल्याचं पत्र पाठवलं. ही अशी माणसं जोडण्याचं कसब सायकलच करू शकते. त्या क्षणी टूर सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं. दिब्रूगड ते टूटिंग हा प्रवास आणि ते १५ दिवस खरंच खूप देऊन गेले. ती विस्तीर्ण ब्रह्मपुत्रा, अवखळ सियांग, खडकाळ पर्वतावर देशाच्या रक्षणाला सज्ज असलेले आपले आर्मी जवान, अरुणाचलची प्रेमळ माणसं आणि त्यांचं निसर्गाशी एकरूप होत जगणं.. शहराबाहेरचं हे एक वेगळं चेतनामय विश्व नवीन जागा शोधण्याची, आणखी फिरण्याची आणि नवे अनुभव घेण्याची नवी प्रेरणा देऊन गेलं.
खाली लोखंडी तारांचा सपोर्ट असला तरी त्याखालची खटय़ाळ सियांग घाबरवत होती. पाऊल ठेवताच पूल हलायचा. शेवटी देवाचं नाव घेत सायकल घातली ते पूल संपल्यावरच पायडल मारण्याचा वेग कमी केला.

(शब्दांकन : अरुंधती जोशी)
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 1:40 am

Web Title: cycling tour in arunachal pradesh
टॅग : Nature
Next Stories
1 ‘नऊवारी’चा नखरा वाढला!
2 उलट सुलट
3 लेट्स ‘रॉक’
Just Now!
X