आपल्या मेंदूत शिकण्याची प्रचंड क्षमता आहे आणि सामान्यतः प्रत्येक व्यक्ती ह्या क्षमतेच्या केवळ ५ ते १० टक्के आपल्या बौद्धिक कामामध्ये गुंतवितात. ही क्षमता वाढविण्यासाठी स्वतःची शिकण्याची पध्दत किंवा ‘पर्सनल लर्निंग स्टाईल’ जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःची लर्निंग स्टाईल समजून त्या अनुषंगाने स्वतःच्या अभ्यासाची पध्दत ठरवली तर शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात यश प्राप्त करू शकतात.

नील डी फ्लेमिंग या शिक्षणतज्ज्ञाने जागतिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या वाक (VAK) शिकण्याच्या पध्दतीवर आधारित सिध्दांतामध्ये तीन मुख्य लर्निंग स्टाईल्सचा उल्लेख केला आहे -:

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

१. व्हिजुअल लर्नर किंवा बघण्यातून शिकणारा विदयार्थी (V)

२. ऑडिटरी किंवा श्रवण पध्दतीचा वापर करणारा विदयार्थी (A)

३. काईनेस्थेटिक किंवा शारीरिक क्रियांचा वापर करून शिकणारा विदयार्थी . या विदयार्थ्यास “टेक्टाईल” किंवा स्पर्श, वास यांचा वापर करुन शिकणारा विदयार्थी असेही म्हणतात. (K)

व्हिजुअल लर्नरच्या अभ्यासाच्या पध्दती

१. ग्राफ्स ,चार्ट्स किंवा तक्ते ,फोटो व इतर दृश्य गोष्टींचा माहिती सादरीकरणासाठी वापर

२. कॉन्सेप्ट मॅप किंवा संकल्पना नकाशा, हॅन्ड आउट्स किंवा फलके, माहितीला अधोरेखित करणे

३. वर्गात पुढील बाकावर बसण्याकडे कल

४. एकांतात आणि शांत जागी बसून काम करण्याची आवड

५. माहिती सादरीकर करताना आवश्यक तेथे आकृत्या ,चार्ट्स किंवा तक्ते यांचा वापर

व्हिजुअल लर्नरसाठी अभ्यासासाठी सूचना

१. आपल्या वह्यांतील किंवा पुस्तकातील नोट्स किंवा टीपा याना वेगवेगळया रंगांचे कलर कोड लावून माहितीला आकर्षक बनविणे

२. ह्या विद्यार्थ्यानी स्वतःचा चित्रमय शब्दकोश बनविणे

३. आपल्या माहितीच्या अनुषंगाने आवश्यक तक्ते , नकाशे आणि आकृत्या यांचा समावेश करणे

४. ‘टू डू’ लिस्टचा वापर केल्याने कार्यकुशलता वाढीस लागेल.

५. एकांतात अभ्यास करणे फायदेशीर आणि एखादे सॉफ्ट संगीत अभ्यास करताना लावले तर एकाग्रता वाढण्यास मदत

६. वर्गात पुढील बाकावर बसल्याने फळ्यावर लिहिलेले किंवा शिक्षकांनी दाखविलेल्या गोष्टी समजण्यास सोपे जाते

ऑडिटरी लर्नरच्या अभ्यास पध्दती

१. जेव्हा ऑडिटरी लर्नर समोर एखादया विषयासंबंधी माहिती ऑडिटरी स्वरूपात जसे ऑडिओ फाईल व मौखिक स्वरूपात जसे लेक्चर स्वरूपात मांडली जाते तेव्हा तो अधिक प्रभावीपणे शिकू शकतो.

२. वर्गात जर ऑडिटरी लर्नर एखादया विषयासंबंधीच्या ग्रुप डिस्कशन मध्ये सहभागी झाला तर तो त्या विषयास चांगल्या रीतीने समजू शकतो.

३. जर ऑडिटरी लर्नरला तो शिकत असलेल्या विषयाच्या संबंधात प्रश्न विचारला तर तो त्या प्रश्नाचे उत्तर त्याने ती माहिती ऑडिओ फाईल किंवा लेक्चर स्वरूपात ऐकली असेल तरच व्यवस्थित आठवून देऊ शकतो. ‘ऐकणे किंवा श्रवण’ या क्रियेस प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीने देखील विशेष महत्त्व दिले आहे.

४. ऑडिटरी लर्नरला काहीही आवाज न करता वर्गात शांतपणे विषयासंबंधी अभ्यास करण्यास सांगितले तर त्याला कंटाळा येतो. ह्या लर्नरची वर्गात छबी “बडबड्या “अशी असते.

५. ऑडिटरी लर्नरना चित्रकला किंवा प्रयोगवहीतील आकृत्या काढण्यास आवडत नाही.

६. ऑडिटरी लर्नर वर्गातील बोर्डवरचा क्लासवर्क किंवा वर्गपाठ आणि होमवर्क किंवा गृहपाठ लिहून घेण्यास टाळंटाळ करतात. जर वहीत उतरवून घेतलाच तर त्यात एखादा शब्द किंवा वाक्य गायब असू शकते.

७. लेखी वर्गपाठ आणि लेखी वर्गपरीक्षा यांचे आणि ऑडिटरी लर्नरचे समीकरण कधी जुळून येत नाही. मौखिक किंवा ओरल परीक्षा त्यांच्यासाठी बेस्ट सिद्ध होतात.

ऑडिटरी लर्नरसाठी अभ्यासासाठी सूचना

१. जर ऑडिटरी लर्नर कला किंवा आर्टस् शाखेचा विदयार्थी असेल तर त्याने स्टडी पार्टनर शोधणे जरुरीचे आहे. त्यामुळे तो माहितीला रिविजन किंवा उजळणीच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकतो. तसेच मौखिक प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विषयाचे आकलन चांगल्या पद्धतीने करू शकतो.

२. वर्गातील व्याख्याने किंवा लेक्चर्स जर आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सतत ऐकली तर विषयाचा पाया भरभक्कम होण्यास मदत होते. त्यासाठी संबंधित शिक्षकांची अथवा प्राध्यापकांची अनुमती मिळवीणे आवश्यक आहे.

३. ऑडिटरी लर्नरने वर्गात शिक्षकांच्या समोरील बाकावर बसून लेक्चर ऐकले तर विषय समजण्यास सोपा होतो.

४. अभ्यास करताना जर शास्त्रीय संगीत (इन्स्ट्रुमेंटल )हळू आवाजात ऐकत अभ्यास केला तर मन एकाग्र होण्यास मदत होते.

५. . विषयाच्या संज्ञा ,संकल्पना, तसेच त्यांच्या व्याख्या आपल्या आवाजात मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या तर येता-जाता ऐकल्या तर अभ्यासाच्या उजळणीत किंवा रिविजन मध्ये त्याचा निश्चित फायदा होतो.

काईनेस्थेटिक किंवा शारीरिक क्रियांचा वापर करून शिकणारा विदयार्थी किंवा टेक्टाईल अथवा स्पर्श,वास यांचा वापर करुन शिकणाऱ्या विदयार्थ्याची अभ्यास पध्दती

१. काईनेस्थेटिक किंवा टेक्टाईल विदयार्थ्याला अभ्यास करत असताना वर्गात फिरावयास आवडते, जर असे करावयाचे त्यांना स्वातंत्र्य मिळाले तर ते अधिक प्रभावीपणे विचार करू शकतात.एका जागी स्थिर बसू शकत नाही. जर बाकावर बसला/बसली असेल तर पायाने आवाज करणे अथवा अभ्यास करताना पेन किंवा पेन्सिलीने बाकावर किंवा स्टडी टेबल वर आवाज करणे आवडते.

२. काईनेस्थेटिक विदयार्थ्याना सतत अभ्यास करावयास आवडत नाही .अभ्यासाच्या करताना त्यांना स्नॅक्स ब्रेक किंवा १० मिनिटांसाठी बाहेर फिरुन येण्यास आवडते.

३. काईनेस्थेटिक विदयार्थ्याला विषयाचे वाचन करावयास आवडत नाही. तसेच शब्दांचे स्पेलिंग अचूक सांगणे या विदयार्थ्यांना अवघड जाते. वाचनापेक्षा त्या संकल्पनेवर प्रयोग (experiment) किंवा एखादा (project) करावयास आवडते. तसेच जर विदयार्थ्याला फील्ड वर्क किंवा विषयासंबंधी क्षेत्रात प्रत्यक्ष माहिती गोळा करण्याची संधी दिली तर त्याला तो विषय चांगला समजू शकतो.

४. आपले विचार किंवा भावना हाताच्या मदतीने व्यक्त करतात. उदाहरणार्थ , मित्राला भेटल्यावर त्याला मिठी मारणे किंवा राग आल्यावर थप्पड मारणे.

काईनेस्थेटिक विदयार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी सूचना

१. ह्या विदयार्थ्यांनीं दोरीवरच्या उड्या मारताना किंवा अशा प्रकारचा दुसरा एखादा खेळ खेळत त्यांनी आपल्या विषयाची उजळणी मित्र किंवा पालकांसोबत केली तर चांगल्या रीतीने स्मरणात राहू शकते.

२. महत्त्वाच्या संकल्पना अथवा व्याख्या वाचत असताना पेन्सिल किंवा हायलाईटर अधोरेखित करायची सवय लावली वाचनातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहतील . तसेच पेन्सिलीने संकल्पने संबंधित आकृती किंवा माईंड मॅप तयार केला विषयाचे आकलन होते.

३. रोल प्ले या पध्दतीचा वापर आपल्या क्लासमेट समवेत प्रॅक्टिस करणे.

४. फील्ड ट्रिप्स , केस स्टडीज तसेच प्रोजेक्ट्स आणि विविध प्रकारचे विषयासंबंधी मॉडेल्स तयार करणे.

५. मनाला आणि शरीराला रिलॅक्स करण्यासाठी प्राणायाम तसेच ध्यानाचा वापर जास्तीत करणे

६.संगणकाचा वापर करून विषयासंबंधी सिम्युलेशन्स व ऍनिमेशन्स यांचा वापर केला तर विषयासंबंधी “हॅन्ड्स ऑन” शिक्षण मिळते.

७. आपल्या विषयाच्या नोट्स सतत पुन्हा पुन्हा लिहिल्याने विषयाची उत्तम उजळणी होते.

 

-गौरीता मांजरेकर

ई-लर्निंग अभ्यासक आणि ट्रेनर